माढा लोकसभा मतदारसंघात मराठा समाज भरणार दीड हजार उमेदवारी अर्ज – पंतप्रधान मोदींच्या विरोधात वाराणसी मतदार संघातही उमेदवारी अर्ज भरण्याचा सकल मराठा समाजाचा निर्णय

0 148

माढा लोकसभा मतदारसंघात मराठा समाज भरणार दीड हजार उमेदवारी अर्ज
– पंतप्रधान मोदींच्या विरोधात वाराणसी मतदार संघातही उमेदवारी अर्ज भरण्याचा सकल मराठा समाजाचा निर्णय

सोलापूर : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. मात्र या मागणीकडे राज्य सरकार दुर्लच् करीत असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारचे नाक दाबण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघात मराठा उमेदवार आॅनलाइन अर्ज भरणार आहेत. याशिवाय माढा लोकसभा मतदारसंघात ही सुमारे दीड हजार उमेदवारी अर्ज मराठा समाज भरणार असा निर्णय रविवारी दि. १० मार्च रोजी सोलापुरात सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आल्यानंतर त्याची घोषणा केली.
येथील शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाजाची बैठक झाली. महायुती सरकारने मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यात मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे सगेसोयºयांचा समावेश नाही. मराठा समाजाला ओबीसी प्रवगार्तूनच आरक्षण मिळावे, अशी मागणी सकल मराठा समाज करीत आहे. या मागणीकडे महायुतीचे सरकार वारंवार दुर्लक्ष करीत आहे. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधुन घेण्यासाठी मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन व बैठकांचे आयोजन केले जात आहे. मात्र सरकारकडून दबावतंत्राचा वापर करून आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करून दडपशाही केली जात आहे.
या सरकारच्या हुकूमशाहीला शह देत ही सरकाने चालवलेली मुजोरी कमी करण्यासाठी सकल मराठा समाजाने सत्ताधारी भाजप व मित्र पक्षांची लोकसभा निवडणुकीत कोंडी करण्याचे ठरविल्याचे समाजाचे समन्वयक यांनी सांगितले. याच आंदोनाचा एक भाग म्हणून थेट पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघात शेकडो मराठा बांधव आॅनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यातून मोदी यांची निवडणूक ईव्हीएम यंत्रपेटीऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यास निवडणूक आयोगाला प्रवृत्त केले जाणार आहे.
याशिवाय माढा लोकसभा मतदारसंघातही दीड हजार उमेदवारी अर्ज भरले जाणार असून त्यासाठी प्रत्येक गावातून अर्ज दाखल करण्याची तयारी असल्याचे सकल मराठा समाजाचे समन्वयक यांनी सांगितले. सोलापूर लोकसभेची जागा राखीव असल्यामुळे येथे मराठा समाजाचे उमेदवार राहणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला ओबीसी प्रवगार्तून आरक्षण मिळावे याच उद्देशाने लोकसभा निवडणुकीत थेट पतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा आग्रह असताना त्यामागे सत्ताधारी पक्षाला पराभूत करण्याचा हेतू नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. या बैठकीस पुरूषोत्तम बरडे, रवी मोहिते, श्रीकांत डांगे यांच्यासह मराठा समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रत्येक मतदान केंद्रात दीड हजार पोलिंग एजंट तैनात करण्याचा निर्धार
माढा मतदारसंघात निवडणूक मतदानाच्या दिवशी सकल मराठा समाजाकडून प्रत्येक मतदान केंद्रात दीड हजार पोलिंग एजंट तैनात करण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

Leave A Reply

Your email address will not be published.