तानाजी सावंत हा नासका आंबा आहे, याला जिल्ह्यातून हद्दपार करा माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील

0 29

तानाजी सावंत हा नासका आंबा आहे, याला जिल्ह्यातून हद्दपार करा

  • माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील

परंडा : तानाजी सावंत हा नासका आंबा आहे, याला जिल्ह्यातून हद्दपार करा, असे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांना करून एवढ्या खालच्या पातळीवर खासदारांवर टिका करणे हे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांसाठी चांगलं नाही. आज आमच्यावर हा प्रसंग आलाय उद्या तुमच्यावर ही येईल, त्यामुळे अशा माणसाजवळ कधीच जाऊ नका, मतदार संघातील जनता स्वाभिमानी आहे, सामान्य माणसाला विकत घेण्याची भाषा करणाºयाच्या पैशाची मस्ती लोक जिरवतील. पश्चीम महाराष्ट्रातील सावंत नावाचे पार्सल परत पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा हल्लाबोल करत शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर केलेला टिकेचा निषेध माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी केला.
मिरगव्हाण येथील रविवारी वचनपुर्ति सोहळ्याच्या जाहिर सभेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्यांच्या निषेधार्थ सोमवारी (दि.११) माजी आ. ज्ञानेश्वर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. पुढे बोलताना पाटील म्हणाले, या मतदार संघातील लोक आशा माणसाला फिरू देणार नाहीत. माढ्यात कधीच गुलाल सावंत परिवाराला लागला नव्हता. जिल्हा परिषदेला सिध्देश्वर पाटील यांना उमेदवारी न देता धनंजय सावंत यांना उमेदवारी दिली. तसेच निवडून आणुन पहिल्यांदा गुलाल लावला व पुन्हा तानाजी सावंत यांना शिवसेनेत प्रवेश दिला. यानंतर पक्षप्रमुख ठाकरे यांनी उमेदवारी दिली म्हणून निवडूण आणलं आमदार केलं व ४८ तासात मला वाचवलं, असे सावंत म्हणतात मला काय त्यांनी किडनी दिली का? का पैसे दिले, मला भेटायला आले, मी काय बोलवलं होतं का? आमचे उपकार सावंत विसरलेत, असे सांगून माजी आमदार पाटील यांनी डॉ. सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध करून हल्ला चढवला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मेघराज पाटील, माजी नगराध्यक्ष शिवाजी मेहेर, माजी सभापती शंकर इतापे, जनार्दन मेहेर, शब्बीर पठाण, मन्नान बासले, माजी उपनगराध्यक्ष ईस्माईल कुरेशी, शहरप्रमुख रईस मुजावर, युवा सेना शहरप्रमुख कुणाल जाधव, सुदाम देशमुख, संतोष गायकवाड, ईरफान शेख, प्रशांत गायकवाड, तुकाराम गायकवाड, डॉ. अब्बास मुजावर, दिपक गायकवाड, माणिक शिंदे, अजिनाथ शेळके, मकरंद जोशी, प्रदीप नेटके आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.