बीड लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातून दोन उमेदवार – केंद्र सरकारपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न पोहोचवण्याचा मराठा समाजाचा प्रयत्न

0 32
बीड लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातून दोन उमेदवार
– केंद्र सरकारपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न पोहोचवण्याचा मराठा समाजाचा प्रयत्न
बीड : ओबीसींमधून आरक्षण मिळावे आणि सगेसोयरेची अंमलबजावणी करावी यासाठी आता मराठा आंदोलकांनी आक्रमक आणि आगळा वेगळा पावित्रा घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न पोहोचवण्याचा हा प्रयत्न असणार  आहे, असे सांगितले जात आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीत एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार उभे राहिल्यास निवडणूक घेण्याचे आव्हानच प्रशासनासमोर उभे राहणार आहे. याबरोबरच या बैठकीत इतरही काही ठराव घेण्यात आले असून याची अंमलबजावणी करण्याचा निर्धार देखील मराठा समाज बांधवांनी केलाय.
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यावर नाराज झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांनी लोकसभा निवडणूकीत जास्तीचे उमेदवार उभे करून या सरकारला निवडणूक प्रक्रियेतून वेठीस धरण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच नांदेड जिल्ह्यातील अधार्पूर मतदारसंघात मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत २५० हून अधिक उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.