संदीपान भुमरे यांच्याकडे मद्यविक्रीचे दोन नाही तर १४ परवाने – हातात देशी दारुच्या बाटल्या दाखवत भिंगरी नावाचा दानवेेंकडून जयघोष

0 36

संदीपान भुमरे यांच्याकडे मद्यविक्रीचे दोन नाही तर १४ परवाने
– हातात देशी दारुच्या बाटल्या दाखवत भिंगरी नावाचा दानवेेंकडून जयघोष

छत्रपती संभाजीनगर : प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार फेºयांमध्ये शनिवारी महायुती आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले. त्यांनी केलल्या घोषणाबाजीमुळे शहरातील क्रांती चौकाता दुपारी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दोन हातात देशी दारुच्या बाटल्या उंचावून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना डिवचले. यावेळी दानवे यांनी संदीपान भुमरे यांच्याकडे मद्यविक्रीचे केवळ दोन नाही तर १४ परवाने आहेत आणि ते केवळ दोन वर्षात त्यांना कसे मिळाले, असा सवाल विचारला आहे.

मराठ्यांची भीती नसती तर बारामती वरुन अंतरवालीमध्ये हेलिकॉप्टर आलं नसते – मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा अजित पवार यांचेसह जय पवार यांना टोला
संदीपान भुमरे यांनी त्यांच्या पत्नीचे नावे दोन मद्यविक्रीचे परवाने असल्याची माहिती शपथपत्रात दिल्यानंतर भुमरे यांच्या विरोधातील प्रचाराचे प्रमुख हत्यार म्हणून उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रचार करत होते. तर भुमरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मुस्लिमस्नेही ठरविण्यावर भर दिला होता. उमेदवारांच्या प्रतिमांवर आलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडले. पोलिसांनी व काही कार्यकर्त्यांनी वाद वाढू दिला नाही.

मोदींना मराठा आरक्षण द्वेषाची डनगाळी! मराठा धनगर आरक्षणाला मोदींच्या अप्रत्यक्ष विरोधामुळे जिल्ह्यात भाजपविरोधी लाट
क्रांती चौकातून महाविकास आघाडीच्या प्रचार फेरीत विरोधी पक्ष नेते अंबदास दानवे सहभागी झाले होते. भुमरे यांच्या मद्यविक्रीचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी त्यांनी दोन बाटल्या हातात धरल्या. महायुतीचा उमेदवार भिंगरी विक्रेता असे सांगत त्यांनी भिंगरी, भिंगरी असे म्हणत डिवचले. जमलेले कार्यकर्त्यांनी मग तीच घोषणा केली. भुमरे यांच्या मद्यविक्रीचे केवळ दोन नाही तर १४ परवाने आहेत आणि ते केवळ दोन वर्षात त्यांना कसे मिळाले, असा सवालही अंबदास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेतून केला होता.

छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या रिंगणात मद्य विक्रेत्यांचा सुळसुळाट – संदीपान भुमरेंच्या पत्नीच्या नावे मद्यविक्रीचे परवाने, शपथपत्रात मद्य परवान्यांची नोंद
एका बाजूला मद्यविक्रेता, दारुडा अशा उपमा देऊन प्रचार केला जात असताना संदीपान भुमरे यांनी खैरे यांच्या हिंदूत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, पूर्वी कोणी सभेत चुकून औरंगाबाद म्हटले तर खैरे त्याला संभाजीनगर म्हणा नाही तर सभेतून बाहेर काढा म्हणायचे. आता त्यांना औरंगाबाद म्हणायचे की संभाजीनगर म्हणायचे याचा संभ्रम आहे. त्यांची खरी प्रतिमा आता बाहेर येऊ लागली आहे. भुमरे यांच्या प्रचारासाठी आलेल्या निलम गोºहे यांनी खैरे ही व्यक्ती डुप्लीकेट असल्याची टीका केली होती. खैरे यांच्या नावाचा अपभ्रंशही करण्यात आला. त्यांचे नाव मुस्लिम वाटावे असे त्यांना हिणवण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.