मला निवडून द्या…. मला निवडून द्या…. मी हात जोडते – गोपीनाथ मुंडेंची आठवण काढत पंकजा मुंडेची भावनिक साद

0 22

मला निवडून द्या…. मला निवडून द्या…. मी हात जोडते
– गोपीनाथ मुंडेंची आठवण काढत पंकजा मुंडेची भावनिक साद

बीड : बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंसाठी उदयनराजे भोसले व अजित पवारांनी सांगता सभा घेतली. यावेळी, भाऊ धनंजय मुंडे हेही व्यासपीठावर होते. बीडमधील भाषणात पंकजा मुंडेंनी त्यांचे दिवंगत वडिल गोपीनाथ मुंडेंची आठवण सांगितली. बीडमध्ये १३ मे रोजी मतदान होत असून ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे. याच ४ जूनची आठवण सांगत पंकजा मुडेंनी बीडकरांना भावनिक सादही घातली. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मला निवडून द्या, मला निवडून द्या. मी हात जोडते, जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका. असे पंकजा मुंडे म्हणाल्या.४ जून ही आपल्या निकालाची तारीख आहे, ४ जूनला याच हातांनी मी मुंडेसाहेबांचे अंत्यसंस्कार केले आहेत. मुंडे साहेबांची सहानुभूती म्हणून मी तुम्हाला मतदान मागत नाही. मला विधानसभा न मागता मिळाली, मला लोकसभा न मागता मिळाली. मुंडेसाहेब या जिल्ह्यात, परळीमध्ये सत्कार घ्यायला येऊ शकले नाही, माझ्या लोकसभेमध्ये जाण्याने, तो सत्कार घेण्यासाठीच हा ४ जूनला निकाल आहे, असे मला वाटते, असे म्हणत पंकजा मुंडेंनी बीडमधील जनतेला भावनिक साद घातली.

संदीपान भुमरे यांच्याकडे मद्यविक्रीचे दोन नाही तर १४ परवाने – हातात देशी दारुच्या बाटल्या दाखवत भिंगरी नावाचा दानवेेंकडून जयघोष

मराठ्यांची भीती नसती तर बारामती वरुन अंतरवालीमध्ये हेलिकॉप्टर आलं नसते – मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा अजित पवार यांचेसह जय पवार यांना टोला
मी राज्यात मंत्री होऊन मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आता पुढचा टप्पा पूर्ण करायचा आहे. त्यामुळे मला निवडून द्या… मी हात जोडते…. अशी भाविनक साद त्यांनी घातली. यावेळी त्या म्हणाल्या, राज्यात मराठा समाजाचे अनेक आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, मग एक पंकजा मुंडे गेली तर कुणाचं काय बिघडणार आहे?, असा सवाल पंकजा यांनी विचारला. मात्र त्यांनी विचारलेल्या प्रश्नाकडे मराठा समाजाने लक्ष न देण्याचा विडा उचलला असल्याचे दिसत आहे.
मी मराठा समाजाच्या बांधवांना भेटले, प्रचारात भेटले, स्वतंत्रही भेटले. त्यावेळी, त्यांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे, ते म्हणाले आम्हाला आरक्षण पाहिजे. आरक्षण म्हणजे कुणबी प्रमाणपत्र पाहिजे, म्हणजे तुम्हाला ओबीसी प्रमाणपत्र पाहिजे. अरे, मग मी अगोदरच ओबीसी आहे ना, तुमच्याचसाठी मी आहे. एखादं नेतृत्व तयार व्हायला ५० वर्षे लागतात. त्यामुळे, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही मला निवडून द्या, जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका, असे आवाहन पंकजा यांनी केले. मात्र त्यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला नाव ठेऊन समस्त मराठा समाजाचा अवमान केल्याने जिल्ह्यात भाजपविरोधी लाट निर्माण झाल्याचे दिसत आहे.

मोदी साहेब मुक्कामालाच महाराष्ट्रात असून त्यांनी मुक्कामासाठी सात आठ गोधड्या आणल्या आहेत – भाजपच्या नेत्यांमुळे मोदींवर वाईट वेळ मनोज जरांगे पाटलांकडून मोदी भाजपची धुलाई
पंकजा मुंडेची ही फुसकी गॅरंटी
मुस्लीम बांधवांना भीती दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. भुलथापा देऊन वेगळाच प्रचार केला जातोय. मात्र, मी मुस्लीम बांधवांना सांगते, कुणाच्या केसालाही धक्का लागणार नाही, ही माझी गॅरंटी आहे, असे म्हणत मु्स्लीम बांधवांनाही पंकजा मुंडेंनी साद घातली. मात्र आंबाजोगाई येथील सभेत पंतप्रधान मोदींना मुस्लिम विरोधी गरळ ओकली त्यावेळी शांत बसलेल्या पंकजा मुंडेची ही फुसकी गॅरंटी असल्याचे मत मुस्लिम समाजाकडून व्यक्त केले जात आहे.

मोदींना मराठा आरक्षण द्वेषाची डनगाळी! मराठा धनगर आरक्षणाला मोदींच्या अप्रत्यक्ष विरोधामुळे जिल्ह्यात भाजपविरोधी लाट

 

Leave A Reply

Your email address will not be published.