सातारा लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या गोदाम परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद – बंद सीसीटीव्ही यंत्रणेमुळे लोकांची मते सुरक्षित असतील का? मतदारांचा सवाल

0 11

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या गोदाम परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद
– बंद सीसीटीव्ही यंत्रणेमुळे लोकांची मते सुरक्षित असतील का? मतदारांचा सवाल

सातारा : लोकसभा निवडणूकीच्या दुसºया टप्प्यातील मतदनावेळी नांदेड व सोलापूर जिल्ह्यातील काही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिन फोडण्याचा आणि त्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार घडला होता. त्यातच सातारा लोकसभा मतदारसंघाची एमआयडीसीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा दि. १० मेपासून कोलमडली असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे केले आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी तक्रारीची तत्काळ दखल घेत ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावली. ठेकेदाराने तत्काळ दखल घेत दिवसभर ही यंत्रणा सुरळीत करण्याचे काम सुरू केले होते. या कोलमडलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेमुळे लोकांची मते सुरक्षित असतील का असा प्रश्न मतदारांच्या मनात घर करताना दिसत आहे.

आधुनिक मनुस्मृती असलेल्या ईव्हीएमवर पेट्रोल टाकून फेटविण्याचा प्रयत्न – मतदानासाठी वापरण्यात येणा-या ईव्हीएम मशीन बोगस असल्याचा तरूणाचा आरोप

ईव्हीएम हटाव, दांडपट्ट्याने ईव्हीएम मशिनची प्रतिकृती फोडत भारतीय बेरोजगार मोर्चाकडून सरकारचा निषेध
सातारा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, एमआयडीसी, सातारा येथील गोदामात सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी ईव्हीएम सुरक्षितेसाठी जिल्हा पोलीस यंत्रणेबरोबरच स्वतंत्र सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र ही सीसीटीव्ही यंत्रणा दिनांक १० मेच्या सकाळपासून बंद असल्याची बाब राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रतिनिधींच्या निदर्शनास आली. याबाबत या प्रतिनिधीने निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सीसीटीव्ही ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर ठेकेदाराने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम सुरू केले आहे.

टाकळी येथील बुथवर इव्हीएम मशिनमध्ये बिघाड – १ तास ४० मिनीटांनंतर मशिन बदलल्यानंतर मतदान सुरूळीत

काळ्या टोपीचा काळा विचार ४ जूनला हातपाय खोडत बाहेर येणार! नवनाथ दत्तात्रय रेपे
महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचे उमेदवार प्रतिनिधी राजकुमार पाटील यांनी सीसीटीव्ही यंत्रणा व त्याची लिंक दि. १० रोजी सकाळपासून वारंवार बंद दिसत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. ईव्हीएम मशिनच्या संरक्षणासाठी बसवलेच्या सीसीटीव्हीची लिंक ही उमेदवार व त्यांच्या उमेदवार प्रतिनिधींना दिली आहे. ही लिंक दि. १० रोजीच्या सकाळपासून गोडावून परिसरातील सीसीटीव्ही कव्हरेज बंद दिसत आहे, अशी तक्रार करण्यात आली. या तक्रारीची दखल सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेऊन लगेच संबंधित ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात ६३.१६ टक्के मतदान
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, दिनांक ७ मे रोजी ६३.१६ टक्के मतदान झाले. १८,८९,७४० लाख मतदारांपैकी ११ लाख ९३,४९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात प्रमुख लढत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे विरुद्ध महायुतीचे भाजपचे उदयनराजे भोसले यांच्यात झाली आहे.
सर्व ईव्हीएम मशिन्स सुरक्षित
सीसीटीव्ही बंद असल्याच्या तक्रारीनंतर प्रशासकीय यंत्रणेने त्याठिकाची तपासणी केली असता गोदामामध्ये संरक्षणासाठी पोलीस व स्वतंत्र सीसीटीव्ही यंत्रणा सुरू आहे. मतदान प्रक्रियेची सर्व ईव्हीएम मशिन्स गोदामात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले.
जोरदार पावसाचे कारण देत बनाव?
ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदाम परिसरात ४३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेच्या गोंधळाबाबत निवडणूक अधिकाºयांकडे चौकशी केली असता गेल्या दोन दिवसापासून या परिसरात वळवाचा पाऊस पडत असल्याने येथील काही सीसीटीव्हीमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.