सावधान ! केरळमध्ये ‘वेस्ट नाईल’ तापाचा फैलाव – आरोग्य यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा

0 288

सावधान ! केरळमध्ये ‘वेस्ट नाईल’ तापाचा फैलाव

– आरोग्य यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा

तिरुअनंतपुरम : कोरोनाचा शिरकाव ज्या राज्यातून झाला त्याच केरळ राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ‘वेस्ट नाईल’ तापाचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. राज्यातील मलप्पुरम, कोझिकोड आणि त्रिशूर जिल्ह्यांमध्ये नुकताच सतर्कतेचा इशारा दिला आहे. या तापाची लक्षणे दिसू लागताच तात्काळ उपचार करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री वीणा जाॅर्ज यांनी केले.

कोव्हॅक्सिन’ लस घेतल्यांनानाही होऊ शकतात रक्ताच्या गुठळ्या! – ‘बीएचयू’ च्या संशोधनातील निष्कर्ष

‘वेस्ट नाईल’ विषाणूवर उपचार करण्यासाठी कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने त्यावर उपचार घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘वेस्ट नाईल’ ताप आलेल्या रुग्णावर वेळीच उपचार न केल्यास एन्सेफलायटीस होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.

‘वेस्ट नाईल’ या रोगाचे विषाणू डेंग्यू सारखेच घातक

केरळमधील जिल्हा वेक्टर कंट्रोल युनिट ने अनेक नमुने गोळा केले आहेत. ही गोळा केलेली सर्व नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या ‘वेस्ट नाईल’ या रोगाचे विषाणू डेंग्यू सारखेच घातक असल्याचे आरोग्यमंत्री वीणा जाॅर्ज यांनी सांगितले असून त्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.