नेपाळ सरकारकडून एमडीएच व एव्हरेस्ट मसाला विक्रीवर बंदी – मसाल्यांमध्ये कीटकनाशके आणि इथिलीन आॅक्साईडची शक्यता वर्तवण्यात आल्याने निर्णय

0 228

नेपाळ सरकारकडून एमडीएच व एव्हरेस्ट मसाला विक्रीवर बंदी
– मसाल्यांमध्ये कीटकनाशके आणि इथिलीन आॅक्साईडची शक्यता वर्तवण्यात आल्याने निर्णय

काठमांडू : नेपाळने एमडीएच आणि एव्हरेस्ट या दोन भारतीय ब्रँडच्या मसाल्यांच्या आयात, वापर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. या मसाल्यांमध्ये कीटकनाशके आणि इथिलीन आॅक्साईड असण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने हा निर्णय घेतला आहे. नेपाळनेही या मसाल्यांमध्ये इथिलीन आॅक्साईडची चाचणी सुरू केली आहे.

कोव्हॅक्सिन’ लस घेतल्यांनानाही होऊ शकतात रक्ताच्या गुठळ्या! – ‘बीएचयू’ च्या संशोधनातील निष्कर्ष

सावधान ! केरळमध्ये ‘वेस्ट नाईल’ तापाचा फैलाव – आरोग्य यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा
इथिलीन आॅक्साईडपासून कर्करोगाचा धोका असतो. नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रवक्ते मोहन कृष्ण महाराजन यांनी सांगितले की, नेपाळमध्ये एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांच्या आयातीवर आठवड्यापूर्वी बंदी घालण्यात आली होती. आम्ही त्याच्या विक्रीवरही बंदी घातली आहे. या दोन ब्रँडच्या मसाल्यांमध्ये इथिलीन आॅक्साईडच्या चाचण्या सुरू आहेत. अंतिम अहवाल येईपर्यंत बंदी कायम राहणार आहे.

हे ईश्वर….. आपण शरीरात लस घेतली हे आपल दुर्देव – बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या प्रतिक्रीयेमुळे मोठी खळबळ

कोरोना लस उत्पादक कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाकडून जगभरातील लस विक्री थांबवण्याचा निर्णय – बाजारातून लस काढून टाकली जाणार असल्याची कंपनीकडून माहिती
एव्हरेस्टच्या चार उत्पादनांवर बंदी
यापूर्वी, हाँगकाँगच्या अन्न नियामक केंद्राने अन्न सुरक्षा (सीएफएस) म्हटले होते की या मसाल्यांमध्ये कीटकनाशके, इथिलीन आॅक्साईड असतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका असतो. एमडीएच आणि एव्हरेस्टच्या चार मसाल्यांच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली. सिंगापूरच्या फूड एजन्सीने एमडीएच, एव्हरेस्ट मसाले परत मागवण्याचे आदेश दिले आहेत.
इथिलीन आॅक्साईडवर बंदी
ब्रिटनच्या फूड स्टँडर्ड्स एजन्सीने स्पष्ट केले की, या वर्षाच्या सुरुवातीपासून भारतीय मसाल्यांमध्ये इथिलीन आॅक्साईडसाठी अतिरिक्त नियंत्रण उपाय केले आहेत. एफएसएने सांगितले की, इथिलीन आॅक्साईडच्या जास्तीत जास्त पातळीसाठी पूर्व चेतावणी प्रणाली आहे. ब्रिटनमध्ये इथिलीन आॅक्साईडवर बंदी आहे.

कोरोना लस उत्पादक कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाकडून जगभरातील लस विक्री थांबवण्याचा निर्णय – बाजारातून लस काढून टाकली जाणार असल्याची कंपनीकडून माहिती

Leave A Reply

Your email address will not be published.