राजस्थानी मल्टीस्टेटच्या संचालकाविरोधात गुन्हे दाखल करा – लातूर येथील एका ठेवीदाराकडून संचालक मंडळाच्या विरोधात तक्रार दाखल

0 68

राजस्थानी मल्टीस्टेटच्या संचालकाविरोधात गुन्हे दाखल करा
– लातूर येथील एका ठेवीदाराकडून संचालक मंडळाच्या विरोधात तक्रार दाखल

बीड : जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टिस्टेटचे सुरेश कुटे यांचेवर माजलगावमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यातच राजस्थानी मल्टीस्टेटच्या संचालकाविरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी परळीचे पोलीस निरीक्षकाकडे केली आहे. लातूर येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाºयांनी राजस्थानी मल्टीस्टेटच्या मोंढा भागातील मुख्य शाखेला सील ठोकले आहे. तसेच अरुणोदय मार्केटमधील शाखेला भेट दिली. लातूर पोलीस ठाण्यातही लातूर येथील एका ठेवीदारांनी संचालक मंडळाच्या विरोधात तक्रार दाखल केल्यावरून गुन्हे दाखल केले आहेत.
परळी येथील मुख्यालय असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेट को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी परळी येथील ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. फसवणूक प्रकरणी २५ एप्रिल रोजी दाखल केलेल्या तक्रारी अर्जावरुन संचालक मंडळावर कारवाई करावी अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे.

ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांना टोप्या घालणा-या कुटेंच्या आडचणीत वाढ – मोदींची गँरटी सांगणारे भाजप नेते सुरेश कुटेंकडे आडकलेल्या पैशाची गँरटी देतील का?
मागील वर्षी जिल्ह्यातील जिजाऊ मल्टिस्टेट सहकारी बँकेत १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. याप्रकरणी जिजाऊ मल्टिस्टेट बँकेचे प्रमुख बबन शिंदे, अध्यक्षा अनिता शिंदे यांच्यासह चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाचे प्रमुख हरिभाऊ खाडे यांनीच लाच मागितल्याची माहिती समोर आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने नुकतीच त्यांच्या घरी धाड टाकली होती. यामध्ये खाडे यांच्या घरातून आठ लाखांची रोकड, साडेनऊ तोळे सोने, पाच किलो चांदी जप्त करण्यात आली होती.
केंद्र सरकारने २०२० मध्ये देशातील १४८२ शासकीय आणि नागरी सहकारी बँका आणि ५८ मल्टीस्टेट कोआॅपरेटिव्ह बँका रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या नियंत्रणाखाली आणण्यासंदर्भात अध्यादेश जारी केला होता. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या नियंत्रणाखाली आल्याने १५४० सहकारी बँकेतील खातेदारांना मोठा दिलासा मिळाला होता. या निर्णयामुळे संबंधित वित्तसंस्थांमध्ये ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींच्या सुरक्षिततेची हमी वाढली होती.
ठेवीदारांच्या शिष्टमंडळाची पोलिसांकडे धाव
या गुन्ह्याच्या तपासासाठी लातूर आर्थिक शाखेचे पोलीस परळीत येऊन गेले. शनिवारी सकाळी परळी येतील ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने राजस्थानी मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती.

सुरेश कुटेंनी अनेक जणांना टोपी घातली

बीडच्या तिरूमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंनी जिल्ह्यातील अनेक जणांना टोपी घातली आहे. त्यांच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट बँकेने २१ मे पासून ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र ते कुठे जिरले हे कुठेच सांगू शकतील. वारंवार तारखांवर तारखा दिल्याने संतप्त ग्राहकांनी माजलगावमध्ये ज्ञानराधावर दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहे. यामध्ये एका गुन्ह्यात ३ लाख ८० रुपयांची फसवणूक तर दुसºया गुन्ह्यात १ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तिरूमला उद्योग समूह याच मल्टीस्टेट बँकेत पैसे अडकल्यामुळे अडचणीत सापडल्याची कारणे ते वारंवार ठेवीदारांना देत आहेत. मोदींची ग्यारंटी सांगणारे भाजपचे नेते त्यांच्या पक्षातील सुरेश कुटेंना घातलेल्या टोपींची हमी घेऊन ठेवीदारांना त्यांच्या पैशाची गॅरटी का देत नाहीत असा सवाल संतप्त ठेवीदारांकडून विचारला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.