मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही – मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा

0 40

मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही
– मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा

बीड : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सरकारला धारेवर धरणारे मनोज जरांगे पाटील हे ८ जून रोजी बीडच्या नारायणगड येथे विराट महासभा घेणार होते. मात्र उन्ह आणि पाण्याचा विचार करून त्यांनी ही सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. विराट महासभा रद्द झाल्याने ते ४ जून आधीच उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते नांदुरघाट येथे बुधवारी झालेल्या दगडफेकीतील जखमी मराठा समाजातील बांधवांच्या भेटीसाठी रुग्णालयात आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुंडे बहीण भावाने चालवलेल्या जातीयवादी राजकारणाचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराही राज्यसरकारला दिला.

मराठ्यांची भीती नसती तर बारामती वरुन अंतरवालीमध्ये हेलिकॉप्टर आलं नसते – मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा अजित पवार यांचेसह जय पवार यांना टोला

मोदी साहेब मुक्कामालाच महाराष्ट्रात असून त्यांनी मुक्कामासाठी सात आठ गोधड्या आणल्या आहेत – भाजपच्या नेत्यांमुळे मोदींवर वाईट वेळ मनोज जरांगे पाटलांकडून मोदी भाजपची धुलाई
यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, बीडमध्ये हा जो प्रकार सुरु आहे तो आता निवडणुकीनंतर होणे मला अपेक्षितच होते. मराठा मताची यांना गरज आहे, परंतु मराठा समाज बांधवांची नाही. त्यांच्या व्यासपीठावर बसणाºया नेत्यांनी ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे. मलाही आता धमक्या येत आहेत. तुझ्याकडे बघून घेऊ, तुला जीवे मारु, असे म्हटले जात आहे. मला बीडमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही. परंतु मुंडे बहीण भावाने एक लक्षात घ्यावे मला बीडमध्ये जर येऊ दिले नाही तर त्यांनाही महाराष्ट्रात फिरायचे आहे. माझा लढा माझ्या समाज बांधवांसाठी आहे. त्यासाठी माझी बलिदानाची देखील तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप नेत्यांनी मराठा आरक्षणाला खोडा घातला – पंतप्रधान मोदींवर इतकी वाईट वेळ, स्वत:चे चिन्ह सोडून दुसºयाच्या चिन्हाचा प्रचार करण्याची वेळ मनोज जरांगेंचा भाजपला टोला

महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवणार – मनोज जरांगे यांचा सर्व राजकीय पक्षांना इशारा
मनोज जरांगे यांनी पंकजा मुडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत म्हटले की, त्या दोघांना अशांतता पसरवायची असेल तर आम्ही काही सहन करणार नाही. त्यांनी माझ्यावरही हल्ले करण्याची धमकी दिली आहे. त्यांना मला बीडमध्ये येऊ द्यायचे नाही पण मी रोज येणार. तुम्ही गुंडगिरी करताय. त्यामुळे दोन्ही बहीण भावांनी हे सगळं लवकर थांबवा. मी कधी विरोध केला त्यांना पाडा असं कधी म्हटलं. महाविकास आघाडीला निवडून आणा, गावागावात आडवा असे मी कधी म्हटलं. कारण लोकशाहीत आपल्याला हक्क आहे, असेही जरांगे म्हणाले आहे.

स्वतःलाच मोठा समजत होता, दिसत नाही हिमालयात बर्फात जाऊन झोपला का काय? – मनोज जरांगे पाटील यांचा मंत्री छगन भुजबळवर निशाणा

राज्यात मराठ्यांच्या भीतीने लोकसभेचं पाच टप्यात मतदान – मनोज जरांगे पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल
मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार
जरांगे पुढे म्हणाले की, होणारी सभा पुढे ढकलली आहे. आता त्या सभेच्या अनुषंगानेच मी ४ जून ची उपोषणाची तारीख जाहीर केली होती. परंतु सभा पुढे ढकलल्याने मी त्याच्या आधीच उपोषण सुरु करणार आहे, असं म्हणत मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले.
मराठ्यांच्या जीवावर मोठं होऊन मराठ्यांचा जीव घ्यायचा
मराठा समाजावर अन्याय हा आधीपासूनच होत आला आहे. मराठा समाजाच्या जीवावर मोठं व्हायचं, मतं मिळवायची आणि पाठबळ घ्यायचं पण मराठा संपवायचा. त्यांना मराठ्यांचा जीव घ्यायचा आहे. दोघा बहिण भावांना आमचा जीव घ्यायचा आहे, त्यासाठी आम्ही तयारचं आहोत. मराठा समाजावर होणारा अन्याय महाराष्ट्र बघतोय. शिरुर, माजलगाव, बीड इथं काय झालं हे मराठा समाज बघतोय. मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असे म्हणत जरांगेंनी मुंडेंना थेट इशारा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.