कोवॅक्सिनच्या दुष्परिणामानंतर आयसीएमआरची बनारस हिंदू युनिव्हर्सिटीस नोटीस – लसीचे दुष्परिणाम आढळून आल्याचा दावा दिशाभूल करणारा आयसीएमआरचे मत

0 95

कोवॅक्सिनच्या दुष्परिणामानंतर आयसीएमआरची बनारस हिंदू युनिव्हर्सिटीस नोटीस
– लसीचे दुष्परिणाम आढळून आल्याचा दावा दिशाभूल करणारा आयसीएमआरचे मत

नवी दिल्ली : बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या संशोधनातून समोर आले आहे की कोवॅक्सिनचे देखील दुष्परिणाम आहेत. यामध्ये इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिर्सचचा हवाला देण्यात आला. आयसीएमआरने यावर प्रतिक्रिया देताना हे चुकीचे म्हटले असून आयसीएमआरने बनारस हिंदू युनिव्हर्सिटीला नोटीस पाठवली आहे. यामध्ये आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी लिहिले आहे की, ज्या संशोधनात लस घेत असलेल्या लोकांमध्ये गंभीर दुष्परिणाम आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे, ते पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि चुकीच्या तथ्यांवर आधारित आहे. याचा आयसीएमआरशी काही संबंध नाही. आयसीएमआरने यासाठी कोणतीही मदत केलेली नाही. आयसीएमआरचे नाव शोधनिबंधातून काढून टाकावे आणि माफी मागावी अशी मागणी केली आहे.

कोव्हॅक्सिन’ लस घेतल्यांनानाही होऊ शकतात रक्ताच्या गुठळ्या! – ‘बीएचयू’ च्या संशोधनातील निष्कर्ष

हे ईश्वर….. आपण शरीरात लस घेतली हे आपल दुर्देव – बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या प्रतिक्रीयेमुळे मोठी खळबळ
आयसीएमआरने लिहिले आहे की अभ्यासात कोवॅकिसनचा उल्लेख करताना म्हटले की, त्याच्या प्रभावाचा एक वर्ष अभ्यास करण्यात आला, परंतु ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्याशी तुलना नाही. मग हे दुष्परिणाम लस घेतलेल्यांनाच झाले हे कसे समजायचे. समोर आलेले दुष्परिणाम हे सामान्य दुष्परिणाम आहेत आणि ते कोणालाही होऊ शकतात. अभ्यासात सामील असलेल्या लोकांच्या पार्श्वभूमीचा कोणताही उल्लेख केलेला नाही. या लोकांना आधीच कोणत्या प्रकारच्या समस्या होत्या याचा उल्लेख नाही. अशा परिस्थितीत, लस घेतल्यानंतरच व्यक्तीला दुष्परिणाम जाणवले आहेत हे कसे तपासता येईल? याचा संबंध कोविड-१९ लसीशी जोडणे योग्य नाही.
संशोधनानुसार, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी येथे केलेल्या अभ्यासात भाग घेतलेल्या सुमारे एक तृतीयांश लोकांमध्ये कोवॅक्सिनचे दुष्परिणाम दिसून आले. या लोकांमध्ये श्वसनाचे संक्रमण, रक्त गोठणे आणि त्वचेशी संबंधित आजार दिसून आले. संशोधकांना आढळले की किशोरवयीन, विशेषत: ज्यांना कोणत्याही अ‍ॅलर्जीचा त्रास आहे, त्यांना कोवॅक्सिनचा धोका असतो.

कोरोना लस उत्पादक कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाकडून जगभरातील लस विक्री थांबवण्याचा निर्णय – बाजारातून लस काढून टाकली जाणार असल्याची कंपनीकडून माहिती

लोकांच्या शरीरात गेलेली धोकादायक लस परत कशी घेणार? – देणगीच्या लालसेपोटी भाजपने करोडोंचा जीव धोक्यात टाकल्याचा अखिलेश यांचा आरोप
गोळा केलेला डेटा एकतर्फी
या अभ्यासात ज्या प्रकारे लोकांचा डेटा गोळा करण्यात आला आहे तो देखील पूर्णपणे एकतर्फी आहे. सर्वेक्षणात सहभागी लोकांकडून फोनवरून माहिती घेण्यात आली आणि त्यांना कोणती समस्या येत आहे, अशी विचारणा करण्यात आली. ही वस्तुस्थिती स्वत:च दिशाभूल करणारी आहे कारण या प्रकरणात कोणतीही शारीरिक तपासणी किंवा रक्त चाचणी केली गेली नाही.
कोवॅक्सिनचे दुष्परिणाम
१६ मे रोजी इकॉनॉमिक टाइम्सने स्प्रिंगरलिंक या विज्ञान जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनाचा हवाला देत लिहिले की, भारत बायोटेकच्या कोरोना लस कोवॅक्सिनचे देखील दुष्परिणाम आहेत.
अ‍ॅस्ट्राजेनिकाची न्यायालयात कबुली
कोविशील्ड ही लस यूकेमध्ये लाँच करण्यात आली तेव्हा तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याला ब्रिटिश विज्ञानाचा विजय म्हटले होते. भारतातही या कोविशील्डचे १७५ कोटी डोस आतापर्यंत दिले गेले आहेत. आता या लसीबाबत मोठा खुलासा झाला आहे. कोविशील्ड लस बनवणाºया अ‍ॅस्ट्राजेनिका या कंपनीने ब्रिटनच्या न्यायालयात दिलेल्या निवेदनात कबूल केले आहे की या लसीमुळे शरीराच्या कोणत्याही भागात रक्तस्त्राव होण्याचे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात.

लस प्रमाणपत्रावरून मोदींची एक्झीट? – कोविशील्ड लसीबाबत वाद सुरू असताना मोदींच्या छायाचित्राबाबत चर्चा

कोरोना लसीमुळे झालेल्या मृत्यूची जबाबदारी घेण्यास केंद्र सरकारचा नकार – केंद्रातील आरएसएस-भाजपा सरकारने झटकले हात

Leave A Reply

Your email address will not be published.