ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांना टोप्या घालणा-या कुटेंच्या आडचणीत वाढ – मोदींची गँरटी सांगणारे भाजप नेते सुरेश कुटेंकडे आडकलेल्या पैशाची गँरटी देतील का?

0 237

ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांना टोप्या घालणा-या कुटेंच्या आडचणीत वाढ
– मोदींची गँरटी सांगणारे भाजप नेते सुरेश कुटेंकडे आडकलेल्या पैशाची गँरटी देतील का?

बीड : बीडच्या तिरूमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंनी जिल्ह्यातील अनेक जणांना टोपी घातली आहे. त्यांच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट बँकेने २१ मे पासून ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र ते कुठे जिरले हे कुठेच सांगू शकतील. वारंवार तारखांवर तारखा दिल्याने संतप्त ग्राहकांनी माजलगावमध्ये ज्ञानराधावर दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहे. यामध्ये एका गुन्ह्यात ३ लाख ८० रुपयांची फसवणूक तर दुसºया गुन्ह्यात १ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तिरूमला उद्योग समूह याच मल्टीस्टेट बँकेत पैसे अडकल्यामुळे अडचणीत सापडल्याची कारणे ते वारंवार ठेवीदारांना देत आहेत. मोदींची ग्यारंटी सांगणारे भाजपचे नेते त्यांच्या पक्षातील सुरेश कुटेंना घातलेल्या टोपींची हमी घेऊन ठेवीदारांना त्यांच्या पैशाची गॅरटी का देत नाहीत असा सवाल संतप्त ठेवीदारांकडून विचारला जात आहे.

कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे देशभरात मृत्यू झाल्याप्रकरणी याचिका दाखल – सर्वोच्च न्यायालयाने केंद्रसरकारला बजावली नोटीस नवी दिल्ली :

नेपाळ सरकारकडून एमडीएच व एव्हरेस्ट मसाला विक्रीवर बंदी – मसाल्यांमध्ये कीटकनाशके आणि इथिलीन आॅक्साईडची शक्यता वर्तवण्यात आल्याने निर्णय
ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेमध्ये ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत आणि हजारो ठेवीदार गेल्या सात महिन्यांपासून आपल्या ठेवी परत मिळतील या आशेवर आहेत. त्यात सुरेश कुठे आमवश्या पोर्णिमेला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ठेवीदारांच्या जखमेवर वांझोटी फुंकर घालण्याचे कसम करून नंतर गायब होत असल्याने ठेवीदारांमध्ये चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये सुरेश कुटे यांनी फसवणूक केल्याप्रकरणी दोन ठेवीदारांनी वेगवेगळे दोन गुन्हे नोंद केले आहेत. यातील पहिला गुन्हा हा तीन लाख ८० हजार रुपयांची फसवणूक तर दुसरा एक लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजलगाव पोलीसांनी नोंद केला आहे. माजलगांवमध्ये दोन गुन्हे नोंद झाल्यामुळे ठेवीदारांना टोप्या घालणाºया सुरेश कुटे यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे.

कोव्हॅक्सिन’ लस घेतल्यांनानाही होऊ शकतात रक्ताच्या गुठळ्या! – ‘बीएचयू’ च्या संशोधनातील निष्कर्ष

हे ईश्वर….. आपण शरीरात लस घेतली हे आपल दुर्देव – बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या प्रतिक्रीयेमुळे मोठी खळबळ
कुटे यांचा भाजपात पक्ष प्रवेश
महाराष्ट्रामधील एक प्रमुख उद्योग समूह म्हणून ओळख असलेल्या बीडमधील तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे मोदींची गँरटी देणारे भाजपचे नेते कुटेंकडे ठेवीदारांच्या आडकलेल्या पैशांची हमी घेऊन ती परत मिळतील याची गँरटी कधी घेतील असा प्रश्न जिल्ह्यातील ठेवीदारांकडून विचारला जात आहे.
तिरुमला उद्योग कार्यालयावर आयकर विभागाची धाड
बीड येथील तिरुमला उद्योग समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागाने १० आॅक्टोबर २०२३ रोजी धाडी टाकल्या होत्या. तिरूमला उद्योग समूहाच्या विविध पाच शहरातील कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्या होत्या. बीड, पुणे, सोलापूर, फलटण, औंगाबादमधील तिरूमला उद्योग समूहाच्या कार्यालयांवर आयकर विभागाने कारवाई करत अनेक कागदपत्रे जप्त केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.