जागतिक आरोग्य संघटनेनुसार एक्स रोग हे भविष्यात महामारीचे कारण

- नवीन साथीच्या रोगाविरूद्ध संरक्षणासाठी लस विकसित केली जातेय

0 354

जागतिक आरोग्य संघटनेनुसार एक्स रोग हे भविष्यात महामारीचे कारण

– नवीन साथीच्या रोगाविरूद्ध संरक्षणासाठी लस विकसित केली जातेय

 

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेनुसार एक्स रोग हे भविष्यात जागतिक महामारीचे पुढील कारण असू शकते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, अज्ञात रोगामुळे होणाऱ्या नवीन साथीच्या रोगाविरूद्ध संरक्षणासाठी लस विकसित केली जात आहे. जागतिक संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे, पुढील दहा वर्षांत कोरोनापेक्षाही भीषण महामारी येण्याची शक्यता असून यासाठी तयार राहणे गरजेचे आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी या अज्ञात रोगाविरूद्ध लस विकसित करण्यास सुरुवात केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी उघड केले आहे की, १०० दिवसांच्या आत प्राणघातक थांबविण्यासाठी लस तयार करण्याच्या कामात ब्रिटीश शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. भविष्यात कोरोनाहून घातक महामारीविरोधात लढण्यासाठीची ही पाऊले आहेत. विल्टशायरमधील सरकारच्या उच्च सुरक्षा पोर्टन डाउन लॅब कॉम्प्लेक्समध्ये ही लस तयार करण्याचे काम सुरु आहे. २०० हून अधिक शास्त्रज्ञांची टीम यासाठी काम करत आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर, भविष्यात कोरोनापेक्षाही अधिक घातक महामारी उद्भवण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे कोरोना महामारी पसरली आणि संपूर्ण जगावर याचा परिणाम झाला. अनेकांचा मृत्यू झाला. तसे भविष्यात होऊन नये म्हणून शास्त्रज्ञ आतापासूनच या रोगाचा शोध घेत असून लस तयार करत आहेत.

लस तयार करणार

रोग माहित नाही मग, लस कशी तयार करणार, असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. प्रत्येक विषाणू वातावरण आणि काळाप्रमाणे स्वत:मध्ये बदल करत असतो आणि अधिक ताकदवर होतो. आता बर्ड फ्लूचे उदाहरण घ्या. या रोगाची लागण आधी फक्त कोंबड्यांना झाली. त्यानंतर हा रोग इतर प्राण्यामध्ये आणि आता माणसांमध्येही परसला आहे. त्याचप्रमाणे सध्या अस्तित्वात असलेले काही जीवाणू किंवा विषाणू भविष्यातील घातक महामारीसाठी कारणीभूत ठरू शकतात. याच दृष्टीने शास्त्रज्ञ आतापासून कामाला लागले असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

एक्स रोग ?

२०१८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने डिसीज एक्स नावाच्या अज्ञात आजारामुळे मानवजातीचा संपूर्ण नाश होण्याचा अंदाज वर्तवला होता. डिसीज एक्स अर्थात रोग एक्स म्हणजे आणि हे नाव कसे पडले हे जाणून घ्या. डब्ल्यूएचओच्या शास्त्रज्ञांनुसार एक्स रोगामुळे भविष्यात जागतिक महामारी होऊ शकते. हा अज्ञात रोग डब्ल्यूएचओच्या रोगांच्या ब्लूप्रिंट यादीचा एक भाग आहे. एक्स रोग हा नेमका कोणत्या विषाणूमुळे पसरले हे अद्याप स्पष्ट नाही.

रोगाचा शोध, उपचार आणि प्रतिबंध

एक्स रोगाचा शोध, उपचार आणि प्रतिबंध यासाठी जलद संशोधन आणि विकास आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, एक्स रोग भविष्यात उद्रेक होणार गंभीर महामारी आहे. हा साथीचा रोग एखाद्या विषाणूमुळे होऊ शकतो, जो सध्या मानवी रोगास कारणीभूत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.