ट्युशन एरियात पोलिसांकडून कोम्बिग आॅपरेशन – ४ पोलिस स्टेशनच्या ५५ कर्मचाºयाकडून ३३ लोकांवर कारवाई

0 21

ट्युशन एरियात पोलिसांकडून कोम्बिग आॅपरेशन
– ४ पोलिस स्टेशनच्या ५५ कर्मचाºयाकडून ३३ लोकांवर कारवाई

लातूर : लातूर शहरातील ट्युशन एरियात पोलिसांनी कोम्बिग आॅपरेशन केले. या आॅपरेशनसाठी चार पोलीस ठाण्याचे ५५ पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी उपस्थित होते़ यामध्ये १० पोलीस अधिकारी आणि ४५ पोलीस कर्मचारी वाहनांचा ताफा घेऊन त्यांनी लातूर येथील ट्युशन एरियामध्ये कारवाई केली. यामध्ये ३३ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
लातूर शहर हे संपूर्ण राज्यात शैक्षणिक पॅटर्नसाठी ओळखले जाते. राज्यभरातून हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. त्यामुळे लातूरच्या शिकवणी परिसरात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी काही समाजकंटक सक्रिय झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ यात नशेच्या आहारी जाण्याचे व चोरी करणाºयांचे प्रमाण वाढले आहे. त्यात गुंडगिरी करणे, मुलींची छेड काढण्याच्या उद्देशाने या भागांमध्ये विनाकारण फिरत राहणे अशा स्वरूपाचे गुन्हे या भागात वारंवार घडत असतात.
या भागातील असामाजिक तत्त्वांवर वचक बसावा यासाठी लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे, गांधी चौक पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे आणि विवेकानंद पोलीस ठाणे येथील अधिकाºयांनी एकत्रित सहभाग घेतला होता. या कोंम्बिग आॅपरेशन दरम्यान या भागांमध्ये विनाकारण फिरणारे आणि गुंडगिरी करणाºया ३३ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
भयमुक्त वातावरणासाठी आॅपरेशन
ट्युशन एरिया मध्ये आतापर्यंत ही पहिलीच कारवाई असल्यामुळे या भागात सातत्याने गुंडगिरी करणाºयामध्ये दहशत निर्माण झाली आहे. या कोम्बिग आॅपरेशन मागचा उद्देश हा संपूर्ण राज्यातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात त्यांच्यातील शैक्षणिक गुणवत्ता विकसित करता यावी हा आहे.
चार पोलिस स्टेशनमधी ५५ कर्मचाºयांची उपस्थिती
शहरातील ट्युशन एरिया भागात मुले आणि मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात मुलींची छेड काढण्यासाठी फिरणाºयावर वचक बसण्यासाठी शिवाजीनगर, गांधी चौक, एमआयडीसी आणि विवेकानंद पोलीस ठाणे चार पोलीस ठाण्यातील जवळपास ५५ पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी उपस्थित होते़ यामध्ये १० पोलीस अधिकारी आणि ४५ पोलीस कर्मचारी उपस्थित होते़

Leave A Reply

Your email address will not be published.