सावरगाव येथे निवडणुकीसाठी गावातून तीन उमेदवार देण्याचा निर्णय – उमेदवारांचा खर्च लोकवर्गणीतून करण्यात येणार

0 84

सावरगाव येथे निवडणुकीसाठी गावातून तीन उमेदवार देण्याचा निर्णय

– उमेदवारांचा खर्च लोकवर्गणीतून करण्यात येणार

सावरगाव : मराठा आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला असतानाच तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी आगामी काळात होणाºया लोकसभा निवडणुकीसाठी गावातून तीन उमेदवार देण्याचा निर्णय सोमवार (दि.४) येथील नागनाथ मंदीरात घेण्यात आलेल्या बैठकीत घेतला. या तिन्ही उमेदवारांचा खर्च लोकवर्गणीतून करण्यात येणार आहे.

विविध धोरणात्मक निर्णयासोबत जो पर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचे समाधान होत नाही तो पर्यंत गावात कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम होवू द्यायचा नाही. सुख दु:खांची परिस्थिती व्यतिरिक्त गावांमध्ये सर्व राजकीय पुढाºयांना गावबंदी असेल, गावपुढाºया व्यतिरिक्त अन्य पुढाºयांचे फोटो लावता येणार नाहीत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा समाजाने अनेक वषार्पासून लढा उभारला आहे. हा लढा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तीव्र झालेला आहे.

सरकारने समाजाला न्याय देण्याचे व त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन वारंवार दिले होते. परंतु त्याची पूर्तता केली नाही. यामुळे समाजाची दिशाभूल झाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला धडा शिकवण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील सावरगाव मध्ये तीन उमेदवार देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.