मुलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी घेतला गाव विक्रीचा निर्णय – गाव विक्री करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी

0 9

मुलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी घेतला गाव विक्रीचा निर्णय
– गाव विक्री करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी
बीड : गावात कोणत्याही मुलभूत सुविधा नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बॅनर लावले आहे आणि त्यावर थेट गाव विक्री करण्याची अनुमती मागण्यात आली आहे. या गावात मूलभूत सुविधा नसल्यानक संतप्त ग्रामस्थांनी चक्क गावच विक्रीला काढल्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात पाहायला मिळाला आहे.
पाटोदा तालुक्यातील खडकवाडी गावात ग्रामस्थांनी गाव विक्रीचे बॅनर लावले आहेत. गावात एक हजार आठशे लोकसंख्या असलेल्या गावात शासनाच्या अनेक योजना कागदोपत्रीच झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गाव विक्री करण्याचे बॅनर लावल्याने या गावची सध्या चर्चा जिल्हाभर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या गावातील विकास कामासाठी वस्तीसाठी अनेक योजना आल्या मात्र यावर मिळालेला पैसा सरपंच आणि इतर अधिकाºयांनी तो उचलून गावासाठी कोणताही विकास न करता खाल्ले असल्याचा आरोप या गावचे नागरिक करीत आहेत.
एवढ्या वषार्पासून या गावात मुलभुत सुविधांचा अभाव असल्याने वारंवार तक्रारीच्या माध्यमातून प्रशासकीय पातळीवर त्या मांडूनही त्यावर कोणतीच दखल घेतली जात नसल्याने संतप्त गावकºयांनी चक्क गावच विक्रीला काढले आहे.


तालुक्यातील अनेक गावात कोणत्याही सोईसुविधाविना नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. या गावामध्ये दर पाच वर्षांनी ग्रामपंचायतमध्ये सरपंच येतो सदस्य असतात मात्र विकास हा केवळ कागदोपत्रीच होत असल्याची तक्रार गामस्थ करताना दिसत आहेत. या गावासाठी जिल्हा प्रशासन एवढी उदासीनता का दाखवत असेल असा सवाल या माध्यमातून पुढे येत आहे. पाटोदा तालुक्यातील खडकवाडी गावातील नागरिकांनी ही अनोखी शक्कल लढवित चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आता गाव विक्री करण्याची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.