शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अल्पवयीन मुलावर गुन्हा

0 119

शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अल्पवयीन मुलावर गुन्हा

भिवंडी : सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचं समोर आलं होतं.  आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाला भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

भिवंडीतील कचेरी पाडा येथे राहणारा उदय पवार रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. उदय पवार यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने त्यांनी रात्रीच्या सुमारास शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. परंतु सुरवातीला पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यांचे स्वतःच इन्स्टाग्राम पेज उघडले असता, त्यांना इन्स्टाग्राम पेजवर दिसले की, कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह कमेंट लिहून पोस्ट केली होती. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेनेचे शहरप्रमुख प्रकाश पाटील (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पोलीस ठाण्यात पोहोचले आणि तातडीने अटक करण्याची मागणी लावून धरली.

त्यानंतर पोलिसांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यां सतरा वर्षीय अल्पवयीन मुलावर भादंवि कलम 153A, 295A अन्वये गुन्हा दाखल करून त्याला काही तासांतच ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.