परळी वै. येथील अकबर शेख अहमद यांचे गॅस सिलेंडर स्फोटाने संपूर्ण घर जळून खाक : ॲड. माधव (आप्पा) जाधव यांच्याकडून आर्थिक मदत

0 47

परळी वै. येथील अकबर शेख अहमद यांचे गॅस सिलेंडर स्फोटाने संपूर्ण घर जळून खाक : ॲड. माधव (आप्पा) जाधव यांच्याकडून आर्थिक मदत

 

परळी (वार्ताहर) : बरकत नगर येथील अकबर शेख अहमद यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फ़ोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले असून या स्फोटामध्ये एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या स्फ़ोटात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अकबर शेख अहमद यांचे घर जळून खाक झाले आहे. त्यांना प्रत्यक्ष भेटून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ऍड माधव आप्पा जाधव यांनी आर्थिक मदत देऊन आधार दिला आहे.

तसेच या स्फोटामध्ये जखमी झालेले शेख जुबेर महबूब व शेख आवाज मैनुद्दीन ह्या जखमींना सुद्धा ऍड माधवबाप्पा जाधव यांच्याकडून धीर देण्यात आला. हा स्फोट एवढा गंभीर होता की अक्षरशा पूर्ण बरकत नगर भाग हादरून गेले आहे. ३०० फुटापर्यंत या स्फोटा दरम्यान सिलेंडरच्या पत्र्याचे तुकडे गेले होते. या स्फोटाची माहिती मिळताच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधव आप्पा जाधव यांनी प्रत्यक्ष भेटून आर्थिक मदत केली व जखमींना आधार दिला याप्रसंगी उपस्थित संभाजी ब्रिगेडचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव सर, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज, काँग्रेसचे नेते शिवश्री नरेश भाऊ हालगे, ज्येष्ठ नेते शिवश्री जमील अध्यक्ष, एमआयएमचे युवा नेते मोहसीन भाई शेख यांच्यासह बरकत नगर भागातील शेख समिर, शेख जूबेर, शेख आपसर, शेख इलियास, शेख आजिम, सय्यद आजु, सय्यद अजगर, सय्यद अयमद, शेख अलिम, शेख रहात, शेख सरफराज, मनियार आरबाज आधी सह गल्लीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.