सावरकर वीर नव्हते : मंत्री प्रियांक खरगे – सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घेत नव्हते हे भाजपा सांगेल का? काँग्रेसचा भाजपला सवाल

0 329

सावरकर वीर नव्हते : मंत्री प्रियांक खरगे
– सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घेत नव्हते हे भाजपा सांगेल का? काँग्रेसचा भाजपला सवाल

बंंगळूरू : विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल नेहमीच चर्चा होते़ काँग्रेसला सवरकारांच्या कर्तृत्वार शंका असल्याने ते नेहमी सावरकरावर टिप्पणी देतात़ मात्र, काँग्रेसकडून केलेल्या वक्तव्यावर नेहमीच भाजपकडून संताप व्यक्त केला जातो़ नुकतेच कर्नाटकातील काँग्रेसचे नेते आणि मंत्री प्रियांक खरगे यांनी सावरकर हे काही वीर नव्हते. जर मी प्रभारी असतो तर सुवर्ण विधानसभेत लावण्यात आलेला त्यांचा फोटो काढून टाकला, सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घेत नव्हते हे भाजपा सांगेल का? असे म्हटल्याने खरगे यांच्या वक्तव्यावर भाजपाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
यापुढे त्यांनी म्हटले की सावरकरांचे योगदान काय? या विषयावर काँग्रेस कार्यालयातील पत्रकार परिषदेत मी दीड तास बोललो. सावरकरांना वीर ही पदवी कशी मिळाली हे भाजपाने सांगितलं पाहिजे. तसेच वीर ही पदवी सावरकरांना कुणी दिली? सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घेत नव्हते हे भाजपा सांगेल का? मी आज माझं मत मांडतो आहे. माझ्या हाती असते तर विधानसभेतून सावरकरांचा फोटो काढून टाकला असता. सावरकर अजिबात वीर नव्हते याबाबत मी आव्हान द्यायलाही तयार आहे.
खरगे योग्य भूमिका मांडली : हरीप्रसाद
काँग्रेस नेते बी़ के़ हरीप्रसाद यांनीही प्रियांक खरगे योग्य भूमिका मांडली आहे़ सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातले योगदान शून्य आहे़ भाजपाची सत्ता आल्याने कर्नाटक विधानसभेत सावरकर यांचे चित्र लावण्यात आले असे म्हणत त्यांनी भाजपाला इतिहास बदलायचा आहे असा आरोप केला.
भाजपचा कार्नाटक काँग्रेसला इशारा
प्रियांक खरगे यांच्याकडे चुकीची माहिती आहे. मात्र त्यांना वाटते की ते सुशिक्षित लोकांपैकी आहेत. कर्नाटक विधानसभेतून जर वीर सावरकरांचे चित्र काढण्याचा प्रयत्न केला तर सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर तीव्र विरोध केला जाईल असा इशारा भाजपा आमदार भरत शेट्टी यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.