वार्तांकन करणा-या पत्रकारासोबत पोलिस अधीक्षकांची अरेरावीची भाषा

0 107

वार्तांकन करणा-या पत्रकारासोबत पोलिस अधीक्षकांची अरेरावीची भाषा

नांदुरा : येथे ३० एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा दैनिक मातृभूमीचे पत्रकार अमर रमेश पाटील हे बातमी मिळविण्यासाठी मतदान केंद्राच्या आवारात आले असता पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब यांनी पत्रकार अमर पाटील यांच्या सोबत अरेरावीची भाषा वापरून ‘तू जाय रे लवकर इथून, इकडे फिरू नको, “तू लवकर निघ इथून तू तुया घरचा मा डोकं नको खराब करू अशी भाषा वापरून पोलीस उपनिरीक्षक रणखांब यांनी त्यांच्या हातातील दांड्याचा धाक दाखवत म्हणाले ‘तू कोणाशी बोलून राहिला, जास्त नको बोलू नाहीतर अंदर टाकीन बाबू’ असे वक्तव्य करतेवेळी नागरिक व पत्रकार उपस्थित होते. सोबतच दैनिक देशोन्नतीचे पत्रकार श्री विनोद गावंडे, दैनिक खोज मास्टर चे प्रतिनिधी शुभम ढवळे यांना सुद्धा लोटपाट केली. पत्रकाराला धमकावने, अरेरावीची भाषा वापरणे ही बाब अत्यंत निंदनीय आहे. याचा आम्ही सर्व पत्रकार जाहीर निषेध करतो. तसेच रणखांब हे भ्रष्ट अधिकारी असून लाच घेण्याच्या त्यांचा धंदाच आहे. याचा पुरावा म्हणजे यापूर्वी १ एप्रिल २०२१ रोजी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १० हजार रुपयांची लाच घेतांना पकडले होते व त्याचेवर कारवाई झाली होती. तरी असा अधिकारी हा समाजासाठी घातक असून पोलिसांची प्रतिमा समाजात मलिन करण्याचे काम अशा अधिकाऱ्यांकडून वारंवार होते.

तरी पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही आपणास विनंती करतो की पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील रणखांब यांची पार्श्वभूमी व आताचे गैरवर्तन लक्षात घेता त्यांच्यावर तात्काळ पत्रकार संरक्षक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा व निलंबनाची कारवाई करण्यात यावी. अन्यथा नाईलाजाने पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी असे आक्रमक निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, जिल्हा पत्रकार संघ बुलडाणा, राष्ट्रीय विर्शगामी पत्रकार संघ नांदूरा याच्यांवतीने पोलिस अधिक्षक बुलढाणा यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा पत्रकार संघ बुलडाणा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, साम टिव्हीचे जिल्हा प्रतिनिधी संजय जाधव, दूरदर्शन प्रतिनिधी युवराज वाघ, पत्रकार संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्ड नितीन पाटील कानडजे, दैनिक गावकर प्रतिनिधी प्रा. सुभाष लहाने, बिसिसयन प्रतिनिधी पवन सोनार, मराठा दर्शन संपादक नारायण पानसरे, विनोद गावंडे, यशवंत पिंगळे, किशोर इंगळे, अमर रमेश पाटील, प्रफुल्ल बिचारे, योगेश धोटे, शे. निसार शे. राशिद, राहुल खंडेराव, शुभम ढवळे, विजयकुमार वर्मा, भानुदास लकडे, देवेंद्र जयस्वाल शे आबिद शे बशीर व इतर बहुसख्य पत्रकार उपस्थित होते. या तक्रार अर्जाची प्रतीलीप मा. गृह राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. पोलीस महासंचालक मुंबई, मा. पोलीस आयुक्त अमरावती, मा. जिल्हाधिकारी बुलडाणा यांना देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.