मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा इशारा – हरियाणात लोकसभेपूर्वी आठ महापालिकांच्या निवडणुका घेण्याची तयारी

0 43

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा इशारा
– हरियाणात लोकसभेपूर्वी आठ महापालिकांच्या निवडणुका घेण्याची तयारी

चंदीगड : हरियाणात पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभेसह आठ महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. कदाचित सरकार जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये महापालिका निवडणुका घेऊ शकते. भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नायबसिंग सैनी यांच्या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी हा इशारा दिला. भाजपच्या पदाधिकाºयांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व कार्यकर्त्यांनी एक टीम बनून काम केले पाहिजे. पुढील वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबरोबरच महामंडळाच्या निवडणुकांनाही सामोरे जावे लागू शकते, असे मुख्यमंत्री खट्टर म्हणाले़
वास्तविक पाहता राज्यातील तीन महापालिकांचा कार्यकाळ आधीच संपला असून, पाच महापालिकांचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपत आहे, अशा स्थितीत लोकसभेपूर्वीच राज्यात महापालिका निवडणुका होऊ शकतात. यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना जोरदार तयारी करावी असे म्हटले आहे असे राजकीय तर्क काढण्यात येत आहेत़ उल्लेखनीय आहे की फरिदाबाद, गुरुग्राम आणि मानेसर महानगरपालिकांचा कार्यकाळ बराच काळपेर्वी पूर्ण झाला आहे. त्याचबरोबर हिस्सार, पानिपत, रोहतक, यमुनानगर, कर्नाल महापालिकेचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपत आहे. अशा परिस्थितीत सरकार आठही महापालिकांच्या निवडणुका एकाच वेळी घेऊ शकते, अशी राजकीय वतुर्ळात चर्चा आहे़

काय आहे महापालिका निवडणुकांचे गणित

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेपूर्वी महापालिकेच्या निवडणुका घेण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. कारण बहुतांश महापालिका निवडणुकांमध्ये सरकार विजयी झाले तर लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी चांगले वातावरण तयार होऊ शकते. गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे लक्ष शहरी मतदारांकडे अधिक आहे. मुख्यमंत्र्यांनी शहरी मतदारांनाही अनेक सुविधा दिल्या आहेत़ राज्यातील ८०० हून अधिक वसाहती नियमित करण्यात आल्या आहेत
व त्यांचे पाणी आणि वीज बील माफ करण्यात आले आहे़

 

Leave A Reply

Your email address will not be published.