पद्मीनी टॅक्सीचा ६० वर्षांचा प्रवास संपला -आजपासून काळ्या पिवळ्या रंगाच्या पद्मीनी टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावरून होणार गायब

0 36

पद्मीनी टॅक्सीचा ६० वर्षांचा प्रवास संपला
-आजपासून काळ्या पिवळ्या रंगाच्या पद्मीनी टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावरून होणार गायब

मुंबई : अनेक दशकांपासून मुंबईची ओळख असलेल्या काळ्या-पिवळ्या रंगाच्या प्रीमियर पद्मिनी टॅक्सीचा प्रवास सोमवारपासून संपत आहे. सहा दशकांपासून देश-विदेशातील व्यापारी, पर्यटक आणि स्थानिक नोकरदार लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी नेणाºया प्रीमियर पद्मिनी कंपनीच्या टॅक्सी आता रस्त्यावर दिसणार नाहीत. वाहतुकीच्या नवीन पद्धती आणि अ‍ॅप-आधारित टॅक्सींच्या आगमनामुळे जुन्या टॅक्सी आधीच बंद झाल्या आहेत. आता अखेच्या काळ्या-पिवळ्या रंगाच्या शेचटच्या पद्मीनी टॅक्सी ची निवृत्त सोमवारी होणार आहे़
मुंबई परिवहन विभागाच्या एका अधिकाºयाने सांगितले की, मुंबईतील टॅक्सींची नोंदणी ताडदेव आरटीओमध्ये केली जाते. प्रीमियर पद्मिनी कारची नोंदणी २९ आॅक्टोबर २००३ रोजी शेवटची काळी पिवळी टॅक्सी म्हणून झाली होती , मुंबईत टॅक्सीची वयोमयार्दा २० वर्षे आहे. त्यामुळे रविवारी शेवटच्या प्रीमियर पद्मिनी काळी पिवळी टॅक्सीचा शेवटचा दिवस असेल आणि सोमवारपासून मुंबईच्या रस्त्यांवर अधिकृत प्रीमियर पद्मिनी काली पिवळी टॅक्सी बगायला मिळणार नाही़
यामुळे १९६४ साली सुरू झालेला पद्मीनीचा प्रवास हा अखेर ६० वर्षानंतर संपणार आहे़ प्रीकमयर आॅटोमोबाइल लिमिटेड नामक कंपनीने या कारचे उत्पादन २००१ सालीच बंद केले आहे़

Leave A Reply

Your email address will not be published.