हिंदूला मुस्लिमांपासून नव्हे तर १० टक्के मनुवादी हिंदूपासून धोका – आरजेडीचे आमदार फतेह बहादूर यांच्या वक्तव्याने मोठी खळबळ

0 107

हिंदूला मुस्लिमांपासून नव्हे तर १० टक्के मनुवादी हिंदूपासून धोका
– आरजेडीचे आमदार फतेह बहादूर यांच्या वक्तव्याने मोठी खळबळ

पाटणा : हिंदू धार्मिक देवतांबाबत आक्षेपार्ह विधान करणारे देहरीचे आरजेडी आमदार फतेह बहादूर यांनी पुन्हा एकदा विधान केले आहे. यापूर्वी त्यांनी दुगार्देवीवर आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या होत्या आणि आता त्यांनी देशातील दहा टक्के हिंदूंना धोकादायक म्हटले आहे. तसेच लोक म्हणतात की सर्व हिंदूंनी एकत्र यावे कारण त्यांना मुस्लिमांपासून मोठा धोका आहे. पण, सत्य हे आहे की या वर्गांना सर्वात मोठा धोका १० टक्के मनुवादी हिंदूंपासून आहे, असे खळबळजणक वक्तव्य आमदार फ तेह बहादूर यांनी केले आहे़
आमदार बहादूर देहरीमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधीत करताना हे वक्तव्य केले़
आपल्या वक्त्यावर जोर देत बहादुर यांनी सांगितले की, देशातील ७२ टक्के हिंदू मागासलेले आहेत, ज्यात एससी-एसटी आणि ओबीसी प्रवगार्तील लोकांचाही समावेश आहे. या लोकांना मुस्लिमापेक्षा त्यांच्याच लोकांचा जास्त धोका आहे, असे आमदार बहादूर म्हणाले़
यावेळी त्यांनी भाजप किंवा इतर हिंदू संघटनांचे नाव न घेता एक पक्ष सतत हिंदूंना संघटित करण्याचा नारा देतो सर्व हिंदूंनी एकत्र यावे, कारण त्यांना मुस्लिमांपासून मोठा धोका आहे, असे या पक्षाकडून सांगण्यात येत मात्र, सत्य हे आहे की या वगार्तील लोकांना १० टक्के हिंदूंपासून सर्वाधिक धोका आहे. हे लोक सत्तेत आहेत आणि मोठ्या पदांवर बसले असून, हे लोक स्वभावाने मनुवादी आहेत, असा अप्रत्यक्ष टोला आमदार बहादूर यांनी भाजपला लगावला़

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.