भाजप सत्तेत आल्यास तेलंगणात मुस्लिमांचे आरक्षण करणार रद्द -भाजप प्रदेशाध्यक्ष रेड्डी

0 46

भाजप सत्तेत आल्यास तेलंगणात मुस्लिमांचे आरक्षण करणार रद्द -भाजप प्रदेशाध्यक्ष रेड्डी

हैदराबाद : केंद्रीय मंत्री आणि तेलंगणातील भाजपचे अध्यक्ष जी. किशन रेड्डी यांनी रविवारी जाहीर केले की भाजप तेलंगणात सत्तेवर आल्यास मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण रद्द करण्यात येईल़ आदिलाबाद आणि पेड्डापल्ली जिल्ह्यातील बीआरएस आणि इतर पक्षांच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर किशन रेड्डी यांनी पक्ष कार्यालयात बैठकीला संबोधित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, नोकºया आणि शिक्षणात मुस्लिमांना दिलेले आरक्षण रद्द करून मागासवगीर्यांना परत दिला जाईल.
राज्यात ३ नोव्हेंबरपासून भाजपचा प्रचार अधिक तीव्र केला जाणार असून अनेक केंद्रीय मंत्री आणि केंद्रीय नेते या प्रचारात सहभागी होणार आहेत. भाजप सत्तेत आल्यास मागासवर्गीय नेत्याला मुख्यमंत्री करेल या गृहमंत्री अमित शहा यांनी सूर्यपेठ येथे केलेल्या घोषणेचा संदर्भ देत रेड्डी म्हणाले की, गृह मंत्र्यांचा हा निर्णय तेलंगणात क्रांती घडवून आणेल, असे किशन रेड्डी म्हणाले़
तेलंगणातील मागासवर्गीय जनता अनेक दशकांपासून मागासवर्गीय समाजाचा मुख्यमंत्री करण्यात यावा अशी मागणी करत आहे़ मात्र निवडून आलेल्या पक्षांनी सत्तेत आल्यानंतर मागासवर्गीय समाजाचा विश्वासघात केला आहे. आता भाजप त्यांची स्वप्ने साकार करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला भ्रष्टाचारमुक्त करत आहेत, त्यांच्या पाठिशी तेलंगणातील जनतेने अभे राहवे असेही मंत्री रेड्डी म्हणाले़

Leave A Reply

Your email address will not be published.