शासकीय शिबिरांवर बहिष्कार, असहकार आंदोलन, सारथी, आण्णासाहेब पाटील महामंडळाची जनजागृती शिबिरे दिशाभूल करणारी – १ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

0 39

शासकीय शिबिरांवर बहिष्कार, असहकार आंदोलन, सारथी, आण्णासाहेब पाटील महामंडळाची जनजागृती शिबिरे दिशाभूल करणारी

– १ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

 

बीड (विवेक कुचेकर) :महाराष्ट्र सरकारने मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी अंतरवली सराटी याठिकाणी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसलेले असुन त्या मागण्या मान्य करण्याऐवजी सरकारकडुन सारथी, आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून शिबिरे भरवत मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे षडयंत्र असुन या दुटप्पी धोरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.३० सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “शासकीय शिबिरांवर बहिष्कार असहकार लक्ष्यवेधी आंदोलन” करण्यात आले असुन दि.१ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणा-या शासकीय शिबिरांवर बहिष्कार टाकुन कार्यक्रम रद्द करण्यात यावा यासाठी निदर्शने करण्याचा ईशारा जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री , प्रधान सचिव, गृहमंत्री यांना दिला आहे.आंदोलनात अनिता भोसले, अशोकभाऊ हिंगे, रमेश चव्हाण, रामनाथ खोड,शेख युनुस, सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार,बप्पासाहेब पवार,आदि सहभागी होते.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षण देण्याची डेडलाईन दि.२४.१०.२०२३ रोजी संपली आहे.दरम्यान आरक्षणाची घोषणा न करता सरकार कडुन सारथी आणि आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची माहिती देण्यासाठी मराठवाड्यात शिबिर आयोजित करण्यात आल्याचे सामान्य प्रशासनाचे सचिव सुमित भांगे यांनी जिल्हाधिकारी बीड यांना दिलेल्या आदेशात मराठवाड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात शिबिरे भरवुन सारथी व आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची सर्व माहिती नागरिकांना देणे,लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारणे,योजनेचा प्रचार, प्रसार व प्रसिद्धी करणे, होर्डिंग्ज, फ्लेक्स,बनर,पोस्टर्स, शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी लावणे तसेच विविध समाज माध्यमांद्वारे प्रचार, प्रसिद्धी करण्यासाठी शिबिर आयोजित करावेत,सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती देण्यासाठी सेमिनार आयोजित करावेत, छत्रपती महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीस सन २०२३-२४ या वर्षामध्ये मराठा,कुणबी,मराठा कुणबी,व कुणबी मराठा अशा एकुण २० हजार उमेदवारांना रोजगारक्षम प्रशिक्षण द्यावयाचे आहे त्याकरीता कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रम याची मागणी नोंदणींचा फार्म विद्यार्थ्यांकडुन भरून घेण्यात यावेत.सारथी संस्थेचे माहिती पत्रक वाटप करावेत तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुकानिहाय प्रत्येक ग्रामपंचायत पर्यंत योजनेची माहिती देण्यात यावी,तालुक्याच्या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करून त्याच ठिकाणी महामंडळाचे नोंदणी करण्यासंदर्भात नियोजन करण्यात यावे.महामंडळांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्वरित व्याज परतावा देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारने आतापर्यंत इतक्या दिवसात सारथी आणि आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बाबत अशा पध्दतीने जनजागृती आणि लाभ मिळवून देण्यासाठी शिबिरे का घेतली नाहीत.मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाल्याने आंदोलनाची तिव्रता कमी करण्यासाठी मराठा समाजाला गोंजारण्याचा हा कुटील डाव असुन तो हाणुन पाडण्यात येईल.

१ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषणाचा सहावा दिवस असुन सरकारच्या संवेदनशीलतेच्या निषेधार्थ दि.१.११.२०२३ बुधवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित” सारथी”आणि आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या जनजागृती कार्यक्रमांवर बहिष्कार घालत शिबिरे रद्द करण्यात यावीत या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.