लग्न समारंभातील अवाजवी खर्चावर आवर घाला जिजाऊ ब्रिगेडचे समाज बांधवाला आवाहन

0 129

लग्न समारंभातील अवाजवी खर्चावर आवर घाला
जिजाऊ ब्रिगेडचे समाज बांधवाला आवाहन

 

मारेगाव (लहु जिवतोडे) : आज होणाऱ्या विवाह सोहळ्यात अवाजवी खर्चावर आळा घातला तरच समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम बनेल अन्यथा समाजाच वाटोळ झाल्याशिवाय रहाणार नाही यासाठी समाज बांधवांनी भविष्याचा विचार करून अनिष्ट रूढी परंपरा व मर्यादित खर्च लग्न सोहळ्या व्हावा यासाठी मारेगाव जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मारेगाव तहसिलदाराना निवेदन देऊन सर्व ग्रामपंचायतीना तसा ठराव घ्यावा असे प्रशासकीय पातळीवर पत्र काढून ग्रामपंचायतला कळवावे अशा आशयाचे निवेदन सादर केले .
सामाजिक पातळीवर कार्य करणारी जिजाऊ ब्रिगेड हे संघटन समाजाचे भले व्हावे यासाठी नेहमी प्रयत्नरत असते, काही दिवसापूर्वी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इजि . पुरुषोत्तम खेडकर यांनी समाज माध्यमावर विवाह समारंभावर होणाऱ्या अवाजवी खर्चाबाबत चिंता व्यक्त करीत विवाह निमित्याने होणाऱ्या अनिष्ट प्रथा परंपरावर सुद्धा आसुड ओढून ह्या बाबी समाजाने बंद करून समारंभावर मर्यादित खर्च करावा असे आवाहन समाज बांधवाना केले, त्या खर्चावर व अनिष्ट प्रथावर पायबंद होण्यासाठी ग्राम पातळीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून जर ठराव घेतले गेले तर या वर प्रभाव होऊ शकतो असे जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचा विश्वास आहे , यासाठी मारेगांव जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मारेगावचे नायब तहसीलदार मत्ते यांना यवतमाळ जिल्हाध्यक्ष सरोजताई देशमुख यांच्या मार्गदर्शनात मारेगाव तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले, यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा लिनाताई पोटे, सचिव शितल पारखी, स्वातीताई बोढे, सारिका कोल्हे, रंजना आत्राम स्टष्टी कोल्हे निवेदन देतेवेळी उपस्थित होत्या .

Leave A Reply

Your email address will not be published.