पुरोगामी विचारांनी पार पडला अंतिम संस्कार पारंपरिक विधींना फाटा देत देहदान करुन बिजेवार गुरुजींचा आदर्श

0 541

पुरोगामी विचारांनी पार पडला अंतिम संस्कार पारंपरिक विधींना फाटा देत देहदान करुन बिजेवार गुरुजींचा आदर्श

 

अंजनगांव सुर्जी (मनोज मेळे): अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धनवाडी येथील आदर्श शिक्षक जयसिंग बिजेवार गुरुजी यांचे नुकतेच आजाराने निधन झाले. बिजेवार गुरुजी हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते होते. ते आधुनिक पुरोगामी विचारांचे कृतीशील प्रचारक होते. त्यांच्या धनवाडी गावात ते नेहमीच अनेक सामाजिक उपक्रम राबवित होते. त्यांच्या सामाजिक कार्याला त्यांची दोन्ही मुले धनराज व तिर्थराज तसेच संपूर्ण कुटूंबियांचा नेहमीच पाठींबा होता. बिजेवार गुरुजी यांनी १९९६ सालीच देहदानाचा संकल्प केलेला होता. त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार आज डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावतीला त्यांचे देहदान आले. यावेळी राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेनुसार सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले. सुरुवातीला गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भजने सादर केली.

त्यानंतर ग्रामगीतेमधील अंत्यसंस्कार या अध्यायाचे डॉ. नरेंद्र तराळे यांनी केले. विजय बोके यांनी वाचन केले. नंतर माजी आमदार रमेश बुंदीले यांच्या अध्यक्षतेखाली श्रध्दांजलीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तेल्हाऱ्याच्या माजी नगराध्यक्ष जयश्री पुंडकर, कट्यारमल गुरुजी, रमेश पांडे, मनोहर साळकर, खाडे गुरुजी यांची भाषणे झाली. त्यानंतर जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी जिजाऊ वंदना सादर केली. यावेळी कुटूंबातील महिलांनी पार्थिवाला खांदा देवून व अंत्ययात्रेत सहभागी होवून पारंपरिक विचारांना फाटा देत पुरोगामी विचारांचे आचरण केले व समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला. सामुहिक राष्ट्रवंदना घेवून पार्थिव पंजाबराव मेडिकल कॉलेजला सुपूर्द करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचालन डाॅ. नरेंद्र तराफे यांनी केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.