दोष कुणाला द्यायचे ?

0 114

दोष कुणाला द्यायचे ?

 

भावा-भावांच्या भांडणामध्ये
आईच हृदय धडधडतंय,
तुझ-माझं म्हणता म्हणता
सगळीकडे अंधार पसरतोय…

अवचीट पिढी लहान असून
संस्कार पूर्ण विसरतेय,
लहान-मोठ्यांचा भान विसरून
जिभ वाकडी वळवतेय…

सासू-सूनांचे प्रेमळ दृश्य
मी स्वत: जवळून अनुभवले,
डोळयांमधले अश्रू पाहून
हृदय माझ कळकळलंय…

चूक कुणाची समजले तरी
बाजू कुणाची घ्यायची,
दोघेजनही आपलेच असताना
दोष ‘कुणाला’ दयायचे ?

 

– पुजा भनगे

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.