राष्ट्रजागृती वारकरी परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी ह.भ.प.मधुकर महाराज बारुळकर

0 47

राष्ट्रजागृती वारकरी परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी ह.भ.प.मधुकर महाराज बारुळकर

 

परांडा : परिवर्तनवादी वारकरी संत चळवळीतले अत्यंत अभ्यासू तथा जुने जानते नेतृत्व म्हणजे ह.भ.प.मधुकर महाराज बारुळकर होत. ज्यांनी गेले अनेक वर्षे आपल्या अमोघ वाणीतून संपूर्ण महाराष्ट्र प्रबोधन किर्तन करत पिंजून काढला आहे. आशा अत्यंत वैचारिक व्यक्तिमत्त्व असणाऱ्या बारुळकर महाराजांना राष्ट्रजागृती वारकरी परिषदेची महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.

दि. २७ एप्रिल रोजी परांडा येथे वारकरी संत संमेलन तथा भारत घोगरे गुरुजींचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.यावेळी पंढरपूरातील कैकाडी महाराज मठाचे सर्वेसर्वा ह.भ.प.भारत महाराज जाधव आणि ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांच्या हस्ते ह.भ.प. मधुकर महाराज बारुळकर यांना नियुक्ती पत्रक देण्यात आले. सर्वांनी बारुळकर महाराजांना निवडीच्या शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.