बैठकीच्या खेळातून जमलेला राजकीय मेळा

0 1,623

बैठकीच्या खेळातून जमलेला राजकीय मेळा

 

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२

 

देशातील मुर्ख लोकांचे प्रमाण। गणण्याची खूण एक आहे ॥१॥
सत्संग बैठका, कथा-प्रवचन। करो क्षीरपान गणपती ॥२॥
बांधता देऊळे होता कुंभमेळे। गर्दीहून कळे प्रमाण हे ॥३॥
वेड्यांचे रंजन सांगे विश्वंभर। शे*च्या केसाला शृंगार समजती॥४॥

वरील अभंग हा विद्रोही कवी विश्वंभर वराट यांनी लिहिलेला आहे. आज रामदासी बैठका घेऊन समाजाला संक्रमित करू पाहणाऱ्या कुपोषित बुद्धीच्या लोकांना हे अल्प बुद्धीचे राजकारणी उरावर घेऊन जेव्हा मंचावर फिरवतात तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते. कोणाला अच्छे दिन येवोत अथवा न येतोत पण रात्रीस खेळ चाले या खेळाला अच्छे दिले आले त्यामुळे तर त्या श्रीरम सेवकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता म्हणून तर ते तडफडायला उन्हात गेले होते. बैठकीच्या खेळातून राजकीय मेळ्यात आलेले लोक सत्तेत आल्यानंतर काय होऊ शकतं हे या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी सहज लक्षात आल. सरकार छक्क्याचं असो वा पंज्याच त्याचा सर्व सामान्य तळागाळातील लोकांना फायदा होईल अथवा त्यांच्या हिताचे निर्णय होतील असं ठासून सांगताच येत नाही. कारण सत्तेत बसलेले रक्तपिपासू ढेकणं जरी आमच्या रक्ताचे अथवा जातीचे वाटत असले तरी ते रेशिमबागेच्या मतीचे निघतात म्हणून तर सारा सत्यानाश होत आहे. आमच्या बहुजनांच रक्त ढोसून खुर्चीत ठाण मांडून बसलेले हे रेशिमबागेच्या विचारांनी पछाडलेले वळू जेव्हा सत्तेत असतात तेव्हा आमच्या बहुजन समाजातील लोकांना पुरस्काराने सन्मानित करण्यापेक्षा एखाद्या नकट्या ब्राम्हणाचा उदो उदो करून त्याचे पाय चाटून त्यांच्या गळ्यात पुष्पहारांच्या माळा घालून पुरस्कारांच्या पुंगळ्या देतात, ती आमच्यातील मनुवादी ढेकणं सत्तेच्या मस्तीने पछाडलेली असतात. पण यांच्या पृष्ठभागाखालची खुर्ची जेव्हा जाते तेव्हा ते महापुरुषांच्या विचारांची बोली बोलून पोपटपंची करतात तेव्हा आम्हालाही वाटत की, अरे व्वा साहेब आमच्या सारख बोलले, म्हणून आम्ही त्यांना डोक्यावर घेतो, तेव्हाच तर आम्ही खरी माती खातो हे किती जणांना माहीत आहे. आज आम्ही रेवदंड्याच्या त्या कुडमुड्याच्या नावाने शंख करतोय, दररोज बोंब मारतोय मात्र त्याकडे ना सरकार लक्ष देतय ना त्यांचा विरोध पक्ष लक्ष देतोय. मग आम्ही केवळ बोंबच मारायची का ? अरे आपण ज्यांचा विरोध करतो त्यांच्या मांडीला मांडी लावून दांडीत दांडी घालण्यात पटाईत असणारे आपल्यातील कसाई ओळखण्याची जोपर्यंत तुम्हाला नजर येणार नाही तोपर्यंत असेच बोंबलत बसावे लागेल. आपण त्या शिवद्रोही बाबा पुरंदरेला पुरस्कार देऊ नका म्हणून बोंब मारत होतो तेव्हा हे आपल्यातील मांडी व दांडी बहाद्दर शांत गप्पगुमान खेळ बघून सत्तेचा मेळ घालत होते. आपण जेव्हा सावरकराच्या नावाने शंख करत होतो, तेव्हा ते तो आमचा विषयच नाही म्हणून भाजपशी हात मिळवणी करत होते. आपण जेव्हा कोश्यारींच्या पृष्ठभागावर लाथा घालून त्यांचा माथा मारा म्हणून टाहो फोडत होतो, तेव्हा ते मंचावर बसून कोश्यारींच्या विषाला प्रतिउत्तर न देता चिडीचुप गुपचूप मिठी मारत होते. या लोकांनी जो विचारांचा द्विगुसमास केला आहे तो कधीतरी समजून घ्या. कारण आपल्याच तर लोकांनी आपल्या लोकांचा काटा काढल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यातील निती आणि मती भ्रष्ट लोक वेळीच बाजूला केले होते, म्हणून तर त्यांनी त्यांना अपेक्षित असलेलं स्वराज्य निर्माण केले. पण तुम्ही आम्ही रेशिमबागेतील विषाणूशी हातमिळवणी करणा-यांना उरावर घेऊन पारावर बसण्याच्या गप्पा मारतोत तेव्हा नवल नव्हे तर तुमच्या बुद्धीची किव येते.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणार अशी घोषणा होताच मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी जी प्रतिक्रिया दिली ती आपल्याला आपले वाटणारे लाडके पुढारी यांनीही दिली असती तर सरकारला झक मारून हा पुरस्कार परत घ्यावा लागला नसता का पण आपल्यानीच माती खाल्ली त्याच काय. कारण २००८ साली सरकार काय मोहन भागवतांच्या विचारांचं नव्हतं तरीपण रेवदंड्याच्या नानासाहेब धर्माधिकारी यांना तत्कालीन सरकारने पुरस्कार देऊन महाराष्ट्राच्या तिजोरीला गंडा घातला होता. यांना २००८ नंतरही सत्ता मिळाली पण त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या लायकीचे प्रा. मा.म. देशमुख, डाॅ. आ.ह. साळूंखे, सत्यपाल महाराज किंवा बहुजन समाजातील इतर कोणी वाटले नसेल का ? त्यामुळे यांनी एकदा सांगून टाकावं की, वरील व्यक्ती या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या लायकीच्या नाहीत अथवा हा पुरस्कारच त्या व्यक्तींच्या लायकीचा नाही किंवा तो देण्यासाठी आम्ही राजकारणी म्हणून त्या लायकीचे नाहीत हे तरी महाराष्ट्राला कळू द्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले की, पुरस्काराच्या पुंगळ्या नानासाहेब धर्माधिकारी यांना अन् भाजपचे सरकार आले आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळतो. आता बर झाल जर हुकूनचुकून म्हणजे इव्हीएमला गाभा घालून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आलीच तर अविनाश धर्माधिकारी यांना पुरस्कार देऊन धर्माधिकारी यांच्या नावाची हॅट्रीक करा म्हणजे कल्याण झाल साहेब ! म्हणून तर प्रा.मा‌.म‌. देशमुख म्हणतात की, ‘जैसे थे स्थिती कायम रहावी म्हणून आपली विद्वत्ता खर्ची घालणारे हे विद्वान परिवर्तनवादी चळवळीतील लहानात लहान कार्यकर्त्याच्या तळपायाच्या धुळीचीही बरोबरी करू शकत नाहीत. हे प्रतिगामी शेणकिडे परिवर्तनवादी सूर्यकिरणांचा प्रकाश कुठून आणणार ? वर्णव्यवस्थेच्या उकीरड्यावर चरणे हाच त्यांचा धर्म !’

आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात उष्माघाताने अन् चेंगराचेंगरीत लोकांचा बळी गेला. या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजक व पुरस्कार स्विकारणा-या कुडमुड्याधिकारींच्या पृष्ठभागावर वेळूच्या काठीचे फटके देऊन डोक्याला सळईचे चटके दिल्यास थोडासा त्यांचा मेंदू जागा होईल नाहीतर या पिलावळी जनतेच्या हातात कमंडलू द्यायला बसल्यात, त्याचे सोयरसुतक काॅग्रेसला आहे ना राष्ट्रवादीला. आम्ही यांना आमचे साहेब, आमचे दादा, आमचे तात्या, आमचे आप्पा टप्पा अन् खप्पा म्हणून निवडूण देतो. मात्र हे तुमचे दादा पादा सत्तेत जातात मनुवादी गप्पा मारतात तेव्हा आमच्या लोकांच्या तळपायाची आग मस्तकात जायला पाहीजे. पण विना मस्तकाच्या राजकीय पुढा-यांचा हस्तक झालेल्या अवलादी खुशाल या भटांच्या चाट्यांपुढे नतमस्तक होताना दिसतात तेव्हा वाईट वाटत म्हणून तर प्रा.मा.म. देशमुख म्हणतात की, ‘भटा ब्राम्हणांचा भाजप निवडून येऊ नये असे बहूजन समाज म्हणत असतो. पण भाजप पेक्षाही घातक असलेला भटा ब्राम्हणांचा खरा पक्ष म्हणजे काॅग्रेस हाच होय, …. या पक्षातील बहुजन पुढारी ‘कळसुत्री बाहुली’ आहेत. बहुजन समाज फुले शाहु आंबेडकर यांच्या विचारांच्या ख-याखु-या बहुजन चळवळीत सामिल होऊ नये म्हणून त्याला पकडून ठेवण्यासाठी काॅग्रेस वगैरे निरनिराळ्या ‘रंगाचे’ ‘पिंजरे’ लावलेले आहेत.’

केवळ तांदळाच्या मा-याने लग्नमंडपातून पसार होणारा हेमलेंद्र बाहुबली नावाचा हा अल्लक निरंजन म्हणत झोळी घेऊन फिरणारा गोसावडा आमच्या छत्रपती शिवाजी महाराज इतिहासात घुसडला. पण आमच्या लोकांच्या हाती राजकीय सत्ता असतानाही त्यांनी याला पाठ्यपुस्तकातून हद्दपार केल नाही, त्यांना आमचे पुढारी म्हणावे तरी कसे ? उघड्या मांड्या घेऊन आपल्या आक्का वेणू सोबत नागडे चाळे करणारा आदिलशहाचा हेर रामदास आणि त्याच्या विषमतावादी उदासबोधाचे गोडवे गाणा-या व्यक्तीला आप्पासाहेब म्हणण्यापेक्षा गप्पासाहेब म्हटलं तर आमचं चुकत कुठे ? त्या गप्पासाहेबांना आमचे बहुजनातील राजकारणी पप्पासाहेब म्हणून डोक्यावर घेऊन मिरवतात ही खुप मोठी शोकांतिका आहे. उघड्या नागड्यांच्या भोंगळ्या विचारांचा प्रचार प्रसार करून या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला वैचारिकदृष्ट्या भोंगळ करू पाहणा-यांच्या हाती पुरस्काराच्या पुंगळ्या देऊन हे सर्वपक्षीय राजकीय नेते नेमकं काय साध्य करू पाहताहेत ? म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
पंडित विद्वान केले वाचस्पती। भटाला पावती भाचीच ॥१॥
स्वातंत्र्य विराची उपमा भ्याडाला । समर्थची केला पळपुटा ॥२॥
जैसे की शेळीला वाघ रंगवले। आम्हाशी वाटले खरेच हे ॥३॥
म्हणे विश्वंभर पडता उघडे। चढता बोकडे वाघावर ॥४॥

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व संभाजी ब्रिगेडने शिवचरित्राला ढसलेला विषारी सर्प नरकुंडवाशी बाबा पुरंदरेंच्या पुरस्काराची घोषणा होताच त्याला विरोध केला होता. तसाच विरोध सर्वपक्षीय राजकारण्याचे पप्पासाहेब म्हणजे रेवदंड्याचे आप्पासाहेब यांच्या पुरस्काराला विरोध केला. पण ज्यांच्या बुध्दीला रेशिमबागेतील अश्व लागले आहे त्यांनी या विरोधाला न जूमानता पुरस्कार दिला. त्या पुरस्कार वितरणाच्या वेळी जे लोक उष्माघाताने मरण पावले त्यांना सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपये मदत केली. तेव्हा श्रीरम ओढणा-या दाडीवाल्या बुढ्याला विचारावं वाटत की, ज्या लोकांना तुम्ही पाच लाखांचे अर्थसहाय्य करत आहात त्यांचं नेमकं योगदान काय ? ते लोक कोणाच्या भल्यासाठी तिथे उन्हात मरायला गेले होते ? त्यांच्या मरण्याने महाराष्ट्राला काय केळ भेटलं का ? ज्यांच्यासाठी तिथे ते श्रीरम सेवक आले होते त्या आप्पासाहेबांच्या तिजोरीतून अर्थसहाय्य द्यायला काय त्यांच्या तिजोरीने पेट घेतला होता का ? आमच्या करातून सरकारी तिजोरीत जमा झालेला पैसा तुम्ही तुमच्या मनावर वाटणार का येडझव्यांनो ? मुख्यमंत्री महोदयांना एवढाच कळवळा येत असेल तर त्यांनी आपल्या घरच्या तिजोरीतून अर्थसहाय्य करायला काय नागडा रामदास नको म्हणत होता का ? सरकारी तिजोरी म्हणजे काय बापाची खाजगी मालमत्ता वाटते का ? हे सरकार ज्यांच्या हाती पुरस्कारांच्या पुंगळ्या देत आहे त्यांच्याविषयी सुभाष सावंत म्हणतात की, आप्पाकडे अध्यात्म, दिव्य शक्ती वगैरे काही नाही, तो काळी कांडी करणारा अघोरी विद्या असणारा तांत्रिक आहे !. तसेच रेवदंड्याच्या कुडमुड्या जोतिष असलेल्या धर्माधिकार्‍याने रामदासी बैठक नावाचा प्रकार सुरू केला अस दै. मूलनिवासी नायकचे कार्यकारी संपादक दिलीप बाईत म्हणतात.

शेवटी बहुजन समाजाला सांगावं वाटतं की, तुम्ही जे तुमच्या जातीपातीचे म्हणून ज्या लोकांना निवडून देतात ते खरेच तुमच्या विचारांचे आणि महापुरुषांचे विचार आचरणात आणणारे आहेत का यांचा विचार करा. कारण आपल्याला आपले वाटणारे पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यासही जर रेवदंड्याच्या गप्पासाहेबांच्या पप्पासाहेबांनाच पुरस्काराची झुल घालून तुम्हाला हुल दिली जात असेल तर तुमची मतदान करतेवेळी झालेली ही भूल आहे हे कधी तरी समजून घ्या. आमची राजकीय लोक भटुर्ड्यांचा लाॅलीपाॅप तोंडात घेऊन तुमच्या विचारांचा कोंडमारा करत असतील तर यांना वेळीच धडा शिकवला पाहीजे, नाहीतर लोकांचं ते कार्ट आणि आपला तो बाब्या असेच तुमचे वर्तन असेल तर भट उरावर बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिवनीतीचा अवलंब करत परक्यांसोबत आपलेही उघडे नागडे करून त्यांनी केलेल ढोंग आणि घेतलेल सोंग उघड पाडा तेव्हाच हे वळू जुंपलेल्या गाडीच्या खिळीवर पडणार नाहीत. नाहीतर उद्या जर हे सत्तेत आले तर आंबारत्न दंगलसम्राट धोतरधारी किडे मास्तरांच्या धोतरात महाराष्ट्र भूषण पुरस्काराची पुंगळी घालून मोकळे होतील, तेव्हा त्यांच्या भूमिकेला विरोध करण्यापेक्षा आताच यांच्या संघनितीला विरोध केलेल काय वाईट आहे. म्हणून तर शेवटी विद्रोही कवी विश्वंभर यांच्याच शब्दांत सांगावं वाटतं की,
“गाढव खुंटाचे उपटील खुंट। ओबीसी लोचट यावेगळे ॥१॥
बुवा-बापू यांच्या भोगी लेकीबाळी। तरी कुरवाळी दाढीशी हे ॥२॥
पितात जावून लंगुटीचे तिर्थ। होतात कृतार्थ बहुजन ॥३॥
म्हणे विश्वंभर कासेचे गोचीड। कासेचीच ओढ लागे त्याशी ॥४॥”

 

नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित खालील पुस्तके घरपोहोच मिळतील

१. भट बोकड मोठा

२. संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू

३. डोळ्यात माणसांच्या फेकून धूळ गेला !

संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)

मो. ९७६२६३६६६२ , ९७६४४०८७९४

 

Leave A Reply

Your email address will not be published.