चाहत्याने घेतले सलमानच्या हातांचे चुंबन

0 25

चाहत्याने घेतले सलमानच्या हातांचे चुंबन

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांची गर्दी दिवसेंदिवस जास्त होताना दिसत आहे़ १९८८ मध्ये डेब्यू करणारा ५७ वर्षीय सलमान आजही चाहत्यांच्या हृदयाचा राजा बनलेला दिसत आहे. चाहत्यांना जसे त्याचे वेड आहे, तसेच भाईजानही ​​त्याला शुभेच्छा द्यायला विसरत नाही. यावेळी सलमानच्या आवडत्या महिला चाहत्याने त्याच्यासोबत फोटो क्लिक केल्यानंतर त्याच्या हातांचे चुंबन घेतले आणि त्याला आय लव्ह यू असे वारंवार सांगितले.
चित्रपट निर्माता आनंद पंडित यांच्या वाढदिवसाची भव्य पार्टी मुंबईत आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये बी-टाऊनचा दबंग सलमान खान यामध्ये सामिल झाला होता़ या पार्टीत रंगत आणल्यानंतर तो पार्टीतून बाहेर येऊन गाडीत बसणार येवढ्यात एका महिलेने त्याला मागून हाक मारली. या महिलेचा आवाज ऐकून तो लगेच वळला आणि तिच्यासोबत एक फोटो क्लिक केला. सलमानच्या आवडत्या महिला चाहत्याने त्याच्यासोबत फोटो क्लिक केल्यानंतर त्याच्या हातांचे चुंबन घेतले आणि त्याला आय लव्ह यू असे वारंवार सांगितले.
सलमान खानने महिलेचे हे हावभाव अतिशय नम्रपणे घेतले, ती पुन्हा पुन्हा त्याच्यावर प्रेम व्यक्त करीत राहिली. यावेळी इतर महिला आणि मुलींनी सलमानसोबत सेल्फी काढले. हे फोटोशेसन सुरू असताना एक लहान मुलगी त्याला आय लव्ह यू असे वारंवार सांगताना दिसली, ज्याला सलमानने खूप प्रेमाने उत्तर दिले. यामुळे सलमानवर लोक किती प्रेम करतात हे यावरून दिसून येते.

Leave A Reply

Your email address will not be published.