व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मिळवता येणार ट्रेनची माहिती

0 53

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मिळवता येणार ट्रेनची माहिती

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून वैयक्तिक आणि व्यावसायिक काम केले जाते. याशिवाय आता कोणत्याही ट्रेनची संपूर्ण माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवता येणार आहे़ यासाठी आधी अनेक प्रकारचे अ‍ॅप इन्स्टॉल करावे लागत होते मात्र आता केवळ हे काम करण्यासाठी पीएनआर नंबरनच्या माध्यातून करता येणार आहे़
भारतीय रेल्वेत दिल्या जाणाºया सेवेचे अनेक फायदे आहेत. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ट्रेनमध्ये जेवण पोहोचवू शकता आणि पुढील स्टेशनची माहिती मिळवता येते़ त्याशिवाय ट्रेनची सद्यस्थिती तपासण्या व्यतिरिक्त व्हॉट्सअ‍ॅपच्याद्वारे पीएनआर आणि लाइव्ह स्टेटस तपासण्यासाठी काही प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत़
यासाठी ग्राहकाला आपल्या फोनमध्ये नंबर (+91-9881193322) सेव्ह करावा लागेल. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर उघडावे लागेल. येथील चॅट विंडो पीएनआर क्रमांक भरावा लागेल आणि सेंड वर ​​क्लिक करावे लागेल.
यानंतरच स्टेटस, ट्रेन स्टेटस आणि अलर्ट रेल्वे चॅटबॉटद्वारे पाठवले जातील. ज्यामध्ये ट्रेनची संपूर्ण माहिती मिळेल. ट्रेनचे लाइव्ह स्टेटस तपासण्यासाठी तुम्ही १३९ वर कॉल करूनही त्या संदर्भातील माहिती मिळवता येते़ तसेच रेल्वेकडून अन्न वितरण सेवा देखील पुरविली जाते. या सेवेचा लाभ घेण्यासाठी, +91 7042062070 हा नंबर सेव्ह करून व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करावा लागेल. येथे १० अंकी पीएनआर क्रमांक टाकल्यानंतर तुमच्यासमोर पर्याय दिसतील. यामध्ये असलेल्या रेस्टॉरंट आणि फूड निवडू शकता ज्या स्टेशनवर तुम्हाला जेवण डिलिव्हरी करायचे आहे. यासाठी आॅनलाइन पेमेंट करावे लागणार आहे़

Leave A Reply

Your email address will not be published.