अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित -राम चरण यांच्याकडून भेटवस्तू

0 46

अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
-राम चरण यांच्याकडून भेटवस्तू

 

नवी दिल्ली : अभिनेता अल्लू अर्जुन याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे़ हा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा तेलगू चित्रपट उद्योगातील पहिला स्टार बनला आहे़ अल्लू अर्जुनचे नाव ऐकताच त्याचा चुलत भाऊ राम चरण आनंदीत झाल्याने त्याने आपल्या भावासाठी एक सुंदर भेटवस्तू पाठवली आहे़
आताच जाहिर झालेल्या ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये पुष्पा या चित्रपटासाठी अभिनेता अल्लू अर्जुनला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे़ यामुळे अल्लू अर्जुनचा चुलत भाऊ राम चरण आणि त्यांच्या पत्नीने खुष होऊन त्याला एक सुंदर भेटवस्तू आणि चिठ्ठी पाठवली आहे़ यानंतर अल्लू अर्जुन याला आपल्या भावाकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे आनंद झाला आहे़ यावेळी त्यांना लिहलेल्या पत्रात त्यांचे आभार मानताना खूप खूप धन्यवाद मानले आहेत़
अल्लू अर्जुन या आपल्या भावाला राम चरण यांनी दिलेल्या पत्रात लिहले की, प्रिय बनी, आम्ही तुझ्यासाठी खूप आनंदी आहोत, भविष्यातही असे पुरस्कार मिळावेत यासाठी आमचे भरपूर प्रेम आणि शुभेच्छा़ अभिनेता अल्लु अर्जुनच्या नावाची घोषणा राष्ट्रीय पुरस्कारासाठी होताच त्यावेळी निर्माता सुकुमार सोबत होता, याने तर त्याला मिठी मारून डोळ्यातून पाणी काढले़ यावेळी उपस्थित असणारे इतर लोकांनी अल्लु अर्जुनचे अभिनंदन करत आनंदोत्सव साजरा केला़
अल्लु अर्जुन आता येणाºया वर्षी होणाºया पुष्पा २ च्या तयारीत असून तो पुन्हा एकदा चित्रपटात पुष्पराजच्या भूमिकेत कमबॅक करणार आहे़ हे तेलगू चित्रपटासाठी खुप ऐतिहासिक पाऊल असल्याचे सांगितले जात आहे़ आतापर्यंतच्या इतिहासात तेलगू चित्रपट उद्योगामध्ये ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये प्रथमच सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांसह ११ पुरस्कार मिळाले आहेत़

 

Leave A Reply

Your email address will not be published.