सीमा सचिनवरील चित्रपटपट वादाच्या भोवºयात -कारची टू नोएडा चा वाद न्यायालयात

0 47

सीमा सचिनवरील चित्रपटपट वादाच्या भोवºयात
-कारची टू नोएडा चा वाद न्यायालयात

नवी दिल्ली : पाकिस्तानमधून आलेल्या सीमा हैदर आणि सचिन हे नेहमी चर्चेत असतात़ आता त्यांच्यावर येणारा कराची टू नोएडा चित्रपट वादाच्या भोवºयात सापडला असून या चित्रपटाचा वाद मुंबई उच्च न्यायालयात सुरू असून या चित्रपटाला मनसेने विरोध करत दिग्दर्शकाला धमकावत असल्याचा प्रकार समोर आला आहे़
सीमा हैदर ही आपल्या लहान मुलांसह नोएडा येथिल आपला प्रियकर सचिनकडे आल्यानंतर सीमा सचिन यांच्यावर जानी फायरफॉक्स फिल्म प्रॉडक्शनने त्यांच्या लव्ह स्टोरीवर कराची टू नोएडा चित्रपट काढण्याची घोषणा केली़ यानंतर या चित्रपटाला सुरूवातही करण्यात येत आहे़ मात्र यावरून आता वाद चिघळला असल्याने याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती समोर येत आहे़
कराची टू नोएडा हा चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांना मनेसकडून सतत धमक्या येत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे़ यावेळी त्यांनी २४ आॅगस्ट रोजी फिल्म मेकर कंबाईनने कराची टु नोएडा आणि मोब्लिन्चिंग ही शीर्षके वादग्रस्त म्हणून नाकारण्यात आली आहेत़
दिग्दर्शकांचा आरोप
कराची टू नोएडा चित्रपटाचे दिग्दर्शक अमित जानी यांनी, हे घराणेशाही पक्षपात आणि भेदभावाचे कृत्य आहे़ हा चित्रपट उत्तर प्रेदशातील एका व्यक्तीने बनवला आहे, हे राज ठाकरेंना सहन होत नाही़ त्यांच्या दबावाखाली आल्याने हा चित्रपट थांबवल्या जात आहे़ यामुळे अमित जानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे़
मनसेकडून धमकी
मागील दोन दिवसांपूर्वी असोसिएशनचे सचिव अनिल नागरथ यांनी कॉल करून मुंबई कार्यालयात येण्यास नकार दिला आणि तुम्ही आलात तर मनसे आमचे कार्यालय फोडेल, असे सांगितले़
चित्रपट फेटाळला
चित्रपटासाठी आॅनलाईन प्रक्रिया १७ आॅगस्टपर्यंत पदवी देण्याच्या वचनबध्दतेवर असोसिएशनने शुल्क आकारले, असा आरोप अमित जानी यांनी केला़ त्यांनी २४ आॅगस्टपर्यंत स्थगिती दिली, शेवटी मनसेच्या दबावाखाली सीमा हैदरवर बनवलेला कराची टू नोएडा चित्रपट वादग्रस्त ठरवून फेटाळण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे़

Leave A Reply

Your email address will not be published.