मुलांच्या तिरळपणाच्या समस्येमुळे पालक हैराण -डोळ्यांची शस्त्रक्रिया करून करावा लागणार तिरळेपणा दुर

0 36

मुलांच्या तिरळपणाच्या समस्येमुळे पालक हैराण
-डोळ्यांची शस्त्रक्रिया करून करावा लागणार तिरळेपणा दुर

 

लातूर : लहान मुले जसजशी मोठी होऊ लागतात तसतसे त्यांच्यात असणारा जन्मजात दोष किंवा मुलांत असलेले व्यंग समोर येते़ यामुळे पालकांची धावाधाव होताना दिसत असून पालकांनी याकडे वेळीच लक्ष दिल्यास यावर मात करता येते़ मागिल चार महिन्यात अंगणवाड्यामध्ये करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत ४५ मुलांना तिरळेपणा दिसून आला आहे़ यापैकी २२ मुलांवर शस्त्रक्रिया करून यांचा तिरळेपणा नष्ट करावा लागणार असल्याने पालकांपुढे ही मोठी समस्या निर्माण झाली आहे़
राज्य सरकारच्या वतीने सन २०१३ पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत असून यातून वयवर्ष ० ते १८ मधील बालक व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते़ ही तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात ३० वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ या पथकाकडून अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोन वेळा व शाळेतील विद्यार्थ्यांची एकदा तपासणी करण्यात येते़
मागील एप्रिल ते जुलै महिन्याअखेर जिल्ह्यातील २५८७ अंगणवाड्यातील १ लाख ६० हजार ४५६ बालकांची तर जुलै महिन्यात ६८ हजार ९६८ शालेय विद्यार्थ्यांची वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली़ या तपासणीत ४५ मुलांमध्ये तिरळेपणाची लक्षणे दिसून आली आहेत़ ही आरोग्य तपासणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ लक्ष्मण देशमुख, डॉ़ प्रदीप ढेले, नेत्र शल्यचिकित्सक डॉ़ श्रीधर पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम समन्वय अमोल झेंडे व त्यांच्या पथकाने केली आहे़
तज्ज्ञामार्फत पुन्हा तपसणी
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील २ लाख ४२४ मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली यात ४५ जणांना तिरळेपणा दिसून आला आहे़ यानंतर या लक्षणे असणाºया मुलाची तपासणी आंबाजोगाई येथील शासकीय रूग्णालयात परत करण्यात आली आहे़
२२ पैकी ६ बालकांची शस्त्रक्रिया
तपासणीत आढळून आलेल्या २२ मुलांपैकी ६ बालकांवर आंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली आहे़ बाकी मुलावर टप्याटप्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे़

Leave A Reply

Your email address will not be published.