भाजपला नाहीतर कोणाला मत देऊ नका -माजी महापौराच्या वक्तव्यामुळे खळबळ

0 44

भाजपला नाहीतर कोणाला मत देऊ नका
-माजी महापौराच्या वक्तव्यामुळे खळबळ

 

भोपाळ : भोपाळचे माजी महापौर आणि मध्यप्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आलोक शर्मा यांनी जौरा या विधानसभा मतदारसंघात संबोधित करताना मुस्लिम समाजाला सांगितले की, तुम्ही भाजपला मद देत नसाल तर कुणालाही मत देऊ नका़ या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे़ या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे़.
भाजपचे माजी महापौर अलोक शर्मा यांनी बोलताना, मी माझ्या मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो की, जर तुम्हाला शर्मा यांना मतदान करायचे नसेल, तर मतदान करू नका, परंतू माझी तुम्हाला विनंत आहे की, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मतदानाला जाऊ नका़ तुम्ही ज्या घरात राहत आहात ते घर तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेतून देण्यात आले आहे, हे सत्य तुम्ही मनापासून स्विकारले पाहिजे, यामुळे लक्षात ठेवा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्यप्रदेशात हज हाऊस बांधले असल्याचेही त्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले़
अल्पसंख्याक आयोगाची सरकारला नोटीस
भाजप उपाध्यक्ष अलोक शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने मध्य प्रदेश सरकारला नोटीश बजावली आहे़ या वक्तव्याची चौकशी करण्याची शिफारस केली असून पुढील तीन आठवड्यात यावर उत्तर मागितले आहे़
अल्पसंख्याक आयोगाने कारवाई करावी
मध्य प्रदेश कॉग्रेस मीडीया सेलचे प्रवक्ते हाफीज शर्मा यांनी अलोक शर्मा यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत अल्पसंख्याक समाजाला हा धमकावण्याचा प्रकार असल्याचे सांगत भाजप मुस्लिमांमध्ये भिती निर्माण करत असल्याचे या वक्तव्यातून दिसून येत आहे़ यामुळे अल्पसंख्याक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे़
अलोक शर्मा यांना उमेदवारी
भोपाळ उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपने माजी महापौर अलोक शर्मा यांना उमेदवारी दिली आहे़ या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची ५५ टक्के आकडेवारी असून २०१८ मध्ये या मतदार संघात काँग्रेसचे आरिफ अक्कील यांचा विजय झाला होता़ २००८ साली अलोक शर्मा हे या मतदार संघातून मोठ्या फरकाने पडले होते़

Leave A Reply

Your email address will not be published.