मत नोटा, कार आणि हाताला दिले तरी कमळालाच जाणार -भाजप खासदाराचे खळबळजनक वक्तव्य

भाजप खासदार डी़ अरविंद कुमार यांनी, तुम्ही तुमचे मत नोटा ला दिले तरी ती जिंकेन, तुम्ही कार म्हणजे बीआरएसला मत दिले तरी मी जिंकेन, तुम्ही हात काँग्रेसला मत दिले तरी कमळ भाजप जिंकेल असे म्हणत आयेगा तो मोदी ही त्यामुळे मत कोणालाही द्या असा विश्वास व्यक्त केला़ मी हे उध्दटपणे बोलत नाही, तर जनतेची सेवा केली आहे.

0 88

मत नोटा, कार आणि हाताला दिले तरी कमळालाच जाणार
-भाजप खासदाराचे खळबळजनक वक्तव्य

निजामाबाद : तेलंगाणा विधानसभा व लोकसभा निवडणूकीची जोरदार चर्चा सुरू असताना भाजपचे खासदार डी अरविंद यांनी मत कोणाला जरी दिले तरी ते भाजपला मिळणार असून मोदींच विजय होणार असल्याचे वक्तव्य केले आहे़ याप्रकरणी बीआरएसच्या नेत्यांनी भाजपवर निशाणा साधत निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी केली आहे़
भाजपचे खासदार डी अरविंद हे निजामाबाद मतदारसंघात एका पत्रकार परिषदेत बोलत होते, यावेळी त्यांनी मतदारांनी मत कोणालाही दिले तरी विजय मोदीच होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत कोणतेही बटण दाबा पण मत कमळालाच जाईल असे म्हटल्याने राज्यासह देशभर गोंधळ उडाला आहे़ यात बीआरएस नेत्यांनी भाजपवर निशाणा साधत निवडणूक आयोगाकडे या प्रकरणाची दखल घेण्याची माणगी केली आहे़
या पत्रकार परिषदेत भाजप खासदार डी़ अरविंद कुमार यांनी, तुम्ही तुमचे मत नोटा ला दिले तरी ती जिंकेन, तुम्ही कार म्हणजे बीआरएसला मत दिले तरी मी जिंकेन, तुम्ही हात काँग्रेसला मत दिले तरी कमळ भाजप जिंकेल असे म्हणत आयेगा तो मोदी ही त्यामुळे मत कोणालाही द्या असा विश्वास व्यक्त केला़ मी हे उध्दटपणे बोलत नाही, तर जनतेची सेवा केली आहे आणि तेच घेऊन त्यांच्याकडे आलो असल्याने त्यांनी सांगितले़
बीआरएस नेते आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री यांची मुलगी कविता राव यांनी, अशोका विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाच्या शोधनिबंधाने देशात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स च्या छेडछाडीवर आधीच चर्चा सुरू केली आहे़ आता सत्ताधारी पक्ष भाजपचे खासदार अशा प्रकारची वक्तव्य केल्याने संशय आला आहे़ त्यामुळे भारतीय निवडणुक आयोगाने याकडे लक्ष देण्याची विनंती त्यांनी केली़
निवडणूक आयोगाला पत्र पाठवणार
यानंतर बीआरएस नेत्या कविता यांनी भाजपवर निशाणा साधताना, ती भारतीय निवडणूक आयोगाला अरविंद यांचे विधान गांभीर्याने घेण्याची विनंती केली़ आम्ही निवडणूक आयोगाला पत्र पाठवणार असल्याचेही त्यांनी हैदराबाद येथील पत्रकार परिषदेत सांगितले़.

Leave A Reply

Your email address will not be published.