खाद्यातेल आयातीमुळे शेतक-यांचे कंबरडे मोडले – सोयाबीनचे दर जैसे थे

0 22

खाद्यातेल आयातीमुळे शेतक-यांचे कंबरडे मोडले
– सोयाबीनचे दर जैसे थे

 

लातूर : केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुक्लामध्ये कपात केल्यानंतर बाहेर देशातून येणा-या तेलामुळे स्थानिक बाजारपेठेत त्याचा परिणाम दिसत आहे़ यामुळे मागील दोन महिन्यापासून सोयाबीनच्या दरात एक रुपयाचीही दरवाढ न झाल्याने केंद्र सरकाने शेतक-यांचे कंबरडे मोडण्याचे काम केल्याची भावणा शेतक-यामध्ये निर्माण झाली आहे़
सोयाबीनच्या दरात आज उद्या दरवाढ होईल या आशेने शेतकºयांनी सोयाबीन घरात ठेवले आहे, ज्या शेतक-यांनी सोयाबीन विकले त्याचा साठा व्यापा-यांनी करून ठेवला़ मात्र मागील दोन महिन्यापासून सोयाबीनच्या दरात वाढ न झाल्याने हे शेतकरी संकटात सापडले आहेत़ मागील २ वर्षांपुर्वी सोयाबीनला १० हजार रूपये प्रति क्विटल एवढा उच्चांकी दर मिळाला होता़ त्यामुळे यावर्षी घाई न करता सोयाबीनच्या दरात वाढ झाल्यास विकता येईल या आपेक्षेन अनेक शेतकºयांनी सोयाबीन घरात ठेवले़
ज्या शेतकºयांच्या आर्थिक आडचणीमुळे सोयाबीन विकावे लागले अशा शेतकºयांचे सोयाबीन खरेदी करून व्यापाºयांनी त्याचा साठा करून ठेवला़ परंतू मागील वर्षी सोयाबीनच्या दरात घसरण होत त्याचा दर ५ हजार ते ५ हजार २०० रूपयांच्या आसपास येऊन ठेवल्याने शेतकºयांनी सोयाबीन न विकण्याचा निर्णय घेऊन दरवाढ होण्याची वाट पाहणे पसंद केले़ मात्र केंद्र सरकाने आता खाद्यतेल आयातीवरील शुल्क कमी केल्याने बाहेर देशातून येणा-या खाद्यतेलामुळे राज्यातील शेतकरी आणि व्यापा-यांचे कंबरडे मोडले असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत.
मागील २ वर्षांखाली अचानक शेवटच्या टप्यात झालेली सोयाबीनची दरवाढ होईल या आशेवर अनेक व्यापारी आणि शेतकरी होते़ मात्र यांच्या आशेवर आयत शुल्काचा फटका बसला आहे़ यावर्षीचा संपुर्ण हंगाम संपून गेला तरी सोयाबीनच्या दरात वाढ न झाल्याने शेतक-यावर आर्थिक संकट आले आहे.
सोयाबीनच्या दरात १ हजार रूपयांची घसरण
उदगीरमध्ये सध्याचा सोयाबीनचा दर ४८५० रूपये प्रति क्विंटल आहे़ या दरात प्रति क्विंटल १ हजार रूपयांची घसरण झाली आहे़ जेव्हा व्यापा-यांनी सोयाबीन ५७०० ते ५८५० रूपये प्रति क्विटल दराने खरेदी करून गोदामात ठेवले होते़ त्यातुलनेत आज शेतक-यांना १ हजार रूपयांचा फटका सहन करावा लागत आहे़ सोयाबीनच्या पडलेल्या दरामुळे शेतकरी आणि व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.