इडी आणि आयकर विभाग भाजपची बी टीम – मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा भाजपवर निशाणा

0 77

इडी आणि आयकर विभाग भाजपची बी टीम
– मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा भाजपवर निशाणा

 

रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मुख्यमंत्रीपदाबाबचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील परंतू भाजपचा राज्यात कोणताच चेहरा नसून जनता त्यांच्यावर नाराज आहे़ त्यामुळे ते इडीचा आधार घेत असून इडी आणि इनकम टॅकस भाजपची बी टीम असल्याचा घणाघात बघेल यांनी केला आहे़
भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्यासमोर कॉग्रेस विकासाचा मुद्दा घेऊन मत मागणार आहे, छत्तीसगडची संस्कृती पुढे नेण्याचे काम काँग्रेसने केले आहे त्यामुळे भाजपकडे कोणतेही तोंड नसल्याची टीका मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केल़ यामुळे भाजपकडून इडीचा आधार घेतला जात आहे़ यावर्षी काँग्रेसच्या अधिवेशनात जे जे हजर होते, त्या लोकांवर छापे टाकण्याचे काम इडीमार्फत भाजपने केले़ इडी आणि इनकम टॅक्स ही भाजपची बी टीम असल्याचाही घणाघात यावेळी मुख्यमंत्री भूपेश बघेल केला.
इडीने मुख्यमंत्र्याचे राजकीय सल्लागार, विशेष कर्तव्य अधिकारी आणि व्यापा-यावर छापे टाकले़ यावेळी आम्हाला तुरूंगात जाण्याची तयारी आहे का असा प्रश्न विचारण्यात आल्याचे सांगत मुख्यमंत्री बघेल यांनी आम्ही मानसिकदृष्ट्या तयार असल्याचे सांगितले होते.
काँग्रेसने मागील निवडणुकीत ७५ जागावर विजय मिळवून तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याबद्दल भाजप नेतृत्वाला रिटर्न गिफट देणार असल्याचा पुनरूच्चार बघेल यांनी केला़ छत्तीसगढमधील सर्व ९० विधानसभा मतदासंघासाठी यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये निवडणूका होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.