जिल्ह्यातील ग्रामपंचायत इमारती सलाईनवर – भिंतीना भेगा; छतांना गळती

0 38

जिल्ह्यातील ग्रामपंचायत इमारती सलाईनवर
– भिंतीना भेगा; छतांना गळती

 

लातूर : गावचा विकास आणि लेखाजोखा ठेवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय असते़ या कार्यालयात कामानिमित्त गावातील नागरिकांची नेहमी वर्दळ असते़ मात्र याकडे आजची ग्रामपंचायत इमारतीची झालेली दयनीय अवस्था कोणाच्याच नजरेला पडताना दिसत नाही़ जिल्ह्यात जवळपास १७२ ग्रामपंचायतच्या इमारतींना भेगा गेल्याने व गळणाºया छतामुळे शेवटच्या घटका मोजत आहेत.
राज्यातील गाव तांडा वस्ती यांच्या विकासासाठी ग्रामपंचायत ही महत्वाची भूमिका निभावणारे केंद्र आहे़ या कार्यालयाच्या माध्यमातून गावातील नागरिकांना अनेक प्रकारचे दस्तऐवज दिले जातात़ या कार्यालयात गावची महत्वाची कागदपत्रे असतात़ मात्र ग्रामपंचायत कार्यालयाच्या भिंतींना पडलेल्या भेंगामुळे आणि गळणाºया छतामुळे या कागदपत्राच नेमक काय होणार असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे़ ग्रामपंचात अधिक सक्षम व्हावी यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो़ तरीही जर या ग्रामपंचायत कार्यालयावर अशी अवकळा येत असेल तर कसे असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे़
मागील काही वर्षांपासून १५ व्या वित्त आयोगातून कोट्यावधी रूपयांचा निधी थेट ग्रामपंचायतच्या खात्यावर जमा होत आहे़ आज जिल्ह्यातील जवळपास ४४ गावात सरपंच, उपसरपंच आणि सदस्य व ग्रामसेवकांना बसण्यासाठी इमारत नाही़ यात १७२ ग्रामपंचायती या सध्या सलाईनवर असलेल्या अवस्थेत आहेत़ या इमारतीमध्ये कोणीही जात नाही़
इमारत नसलेल्या ग्रामपंचायतची संख्या ४४
लातूर ५ औसा १०
निलंगा ९ देवणी ४
उदगीर १० अहमदपूर ३
चाकूर २ रेणापूर १

Leave A Reply

Your email address will not be published.