ओबीसी जनगणना काँग्रेसच्या राज्यांमध्ये का नाही? – भाजपने केला राजकीय प्रश्न उपस्थित

0 45

ओबीसी जनगणना काँग्रेसच्या राज्यांमध्ये का नाही?
– भाजपने केला राजकीय प्रश्न उपस्थित

 

पाटणा : बिहार राज्यात जातीगणनेवरून सुरू झालेले राजकारण सध्यातरी थांबताना दिसत नाही. यावेळी माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य सुशील कुमार मोदी यांनी काँग्रेसशासित राज्यांमध्ये जात जनगणना का झाली नाही आणि कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने जात जनगणना का केली, याचे स्पष्टीकरण द्यावे असा प्रश्न मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विचारला आहे़
यापुढे सुशील मोदी म्हणाले की, नितीश सरकारने २०२२ च्या महापालिका निवडणुकीमध्ये मागास प्रवर्गातील नागरिकांना आरक्षण देण्याची घाई करून जो अहवाल तयार केला, तो आजपर्यंत प्रसिद्ध का केला नाही. त्यामुळे आताचे सरकार जात जनगणनेचा अहवाल सर्वांसाठी सार्वजनिक कसे करेल ? बिहारमध्ये जात जणगनणा करण्याचा निर्णय हा त्या राज्यातील सरकारचा होता यामध्ये भाजपने आपल्या १६ मंत्र्यांची ताकद लावली होती. यावेळी राजद व काँग्रेस या पक्षांचा कुठेही सहभाग नव्हता.
बिहार राज्यात जात जनगणनेचे काम पुुर्ण झाल्यानंतर त्याला बिहार सरकारला उच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळाला आहे. यामुळे सरकारने बिहारच्या इतर अनेक विभागातील शिक्षक आणि कर्मचाºयांना कामाला लावून जनगणना लवकर पूर्ण करण्याचे काम केले़ सरकारने अ‍ॅप च्या मदतीने डेटा एन्ट्रीचे काम केले. या जनगणनेचा संपूर्ण अहवाल मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.