अमेरिकेत कोरोनाचे पुनरागमन ? -कोरोनाचा नवीन प्रकार सापडल्याचा दावा

0 39

अमेरिकेत कोरोनाचे पुनरागमन ?
-कोरोनाचा नवीन प्रकार सापडल्याचा दावा

 

वॉशिंग्टन : कोरोना परत येतोय असा दावा यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनद्वारे यूएस, डेन्मार्क आणि इस्रायलमध्ये कोवीड १९ चे एक नवीन कुटुंब ‘बीए़२़८६’ आढळले आहे़ या हिवाळ्यात त्याचा प्रसार होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे़ याविषयी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने आम्ही ‘बीए़२़८६’ बद्दल अधिक माहिती काढत असल्याचे सांगून कोवीड १९ प्रमाणे स्वत:चे रक्षण करा असे म्हटले़
डब्ल्यूएचओने एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तन लक्षात घेऊन त्यांनी ‘बीए़२़८६’ ला देखरेखीखाली ठेवले असल्याचे रॉयटर्सच्या अहवालात म्हटले आहे़ डब्ल्यूएचओच्या मते, आत्तापर्यंत असे काही देश आहेत जिथे या प्रकारची नोंद आहे़ ह्यूस्टन मेथोडिस्ट येथील डायग्नोस्टिक मायक्रोबायोलॉजीचे वैद्यकीय संचालक डॉ़ वेस्ली लाँग यांनी याविषयी सांगितले की, एनवायए उत्परिवर्तन प्रामुख्याने ‘एक्सबीबी़१़५’ प्रकारातून प्राप्त झाले आहे़ हे पाहणे बाकी आहे की, बीए़२़८६ विषाणू पूर्वीची प्रतिकारकशक्ती किंवा लस टिकून राहू शकते का ? ‘एक्सबीबी़१़५’ हा टाळण्यासाठी बुस्टर शॉट्स जगभरात लागू केले गेले़
फ्रेड हचिन्सन कॅन्सर सेंटरचे विषाणूशास्त्रज्ज्ञ जेमी ब्लूम म्हणतात की, ‘बीए़२़८६’ हा कदाचित सध्याच्या प्रकारापेक्षा कमी संसर्गजन्य आहे़ त्यामुळे याचा प्रचार कधीच होऊ शकत नाही़ तसेच डॉ़ लाँग म्हणाले की, माझी सर्वात मोठी चिंता ही आहे की, ती जून्या लाटेपेक्षा जास्त पसरू नये़ या नव्या कोरोनावर मात करण्यासाठी बुस्टर अजूनही सर्वसाधारपणे लढण्यास मदत करेल़
लक्षणे दिसत असतील तर चाचणी करा
तुम्हाला जर कोरोनाची लक्षणे असतील तर तुमची चाचणी करून त्याचा रिपोर्ट येईपर्यंत इतरांना भेटणे टाळा़ लक्षणे आढळल्यास घरात आणि घराबाहेर १० दिवस चांगला मास्क लावावा़ निरोगी व्यक्तीला भेटणे टाळावे असे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडून सांगण्यात येत आहे़
बुस्टर डोस घ्यावा ?
बीए़२़८६ विषाणू पूर्वीची प्रतिकारकशक्ती किंवा लस टिकून राहू शकते का ? ‘एक्सबीबी़१़५’ हा टाळण्यासाठी बुस्टर शॉट्स जगभरात लागू केले गेले़

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.