लातूर जिल्ह्याला मिळणार ७५ इलेक्ट्रिकल बस -लवकरच प्रवासाच्या सेवेत दाखल

0 45

लातूर जिल्ह्याला मिळणार ७५ इलेक्ट्रिकल बस
-लवकरच प्रवासाच्या सेवेत दाखल

 

लातूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे प्रवाशांना आधुनिक सेवा सुविधा पुरविताना दिसत आहे़ याचच एक भाग म्हणून लातूर विभागात नवीन कोºया इलेक्ट्रिकल बसेस दाखल होणार आहेत़ या बस आल्यानंतर त्या लवकरच प्रवासाच्या सेवेत रूजू करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ लातूर विभागाच्या वतीने १०३ गाड्यांचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे़ या प्रस्तावाच्या मागणीतील सर्व बसेस मंजून झाल्या नाहीत तर किमान ७५ बसेस मंजूर होतील असा विश्वास विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी व्यक्त केला आहे़ या बसेस डिसेंबर अखेरपर्यंत लातूर विभागाला मिळतील़ यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारामध्ये चार्जिंग पॉईट तयार करण्यात येणार आहे. तसेच शहारातील रेणापूर नाका येथे असलेल्या बसस्थानक क्रमांक दोन येथे चार्जिंग स्टेशन उभे करणयात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागाला इलेक्ट्रिक बस मिळाल्या आहेत़ आता तशाच बस लातूर विभागाला मिळणार आहेत़ या गाड्यामध्ये २५० ते ३०० किमी क्षमतेची बॅटीरी आहे़ यात दोन प्रकारच्या गाड्या आहेत, एका गाडीची बॅटरी क्षमता २५० किमी तर दुसºया गाडीची बॅटरी क्षमता ३०० किमी आहे़
चॅर्जिंग पॉईटची सोय
जिल्ह्यातील लातूर, औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर या पाचही आगारामध्ये इलेक्ट्रिकल गाड्यांसाठी चार्जिंग पॉईट असणार आहे़ बसची बॅटरी उतरल्यास ती चार्जिंग लावण्याची व्यवस्था प्रत्येक आगारत करण्यात येणार आहे़
लातूर विभाग फायद्यात
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशांसाठी नवनवीन योजना दिल्यामुळे प्रवाशी संख्येत वाढ झाली आहे़ यामुळे लातूर विभागाला गेल्या तीन महिन्यात ४२ लाख १० हजार रूपयांचा नफा झाला आहे़ यापुर्वी एसटी तोट्यात असल्याचे विभाग नियंत्रक जानराव यांनी सांगितले़
लातूर आगार धुरमुक्त
लातूर आगारामध्ये १४ बस स्क्रॅप करण्यात आल्या तर अनेक बसचे इंजिन बदलण्यात आले आहे़ या आगारामध्ये १५ वर्षाच्या पुढील एकही बस नाही, आरटीओच्या नियमांनूसार सर्व गाड्या व्यवस्थित आहेत़ यात आता नव्या इलेक्ट्रिक बसची भर पडणार असल्याने लातूर आगाराच्या बस धुरमुक्त दिसणार असल्याचे नियंत्रक अश्वजित जानराव यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.