लातूर शहरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ -निर्बीजीकरणाचा उपक्रम बंद असल्याचा परिणाम

0 42

लातूर शहरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ
-निर्बीजीकरणाचा उपक्रम बंद असल्याचा परिणाम

 

लातूर : शहरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे़ हे कुत्रे धावत्या दुचाकीच्या मागे धावत असल्याने अपघाताचे प्रमाणात वाढ झाले आहे़ मागील अनेक दिवसांपासून शहरातील कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा उपक्रम बंद असल्याने कुत्र्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे़.
मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर आळा बसावा म्हूणन महानगरपालिकेच्या वतीने शहरातील साई येथे निर्बीजीकरण केंद्र सुरू केले होते. मात्र आलेल्या आडचणींमुळे केंद्र बंद पडले आहे. हे केंद्र केवळ एप्रिल आणि मे हे दोनच महिने चालले़ यानंतर जून पासून हे केंद्र बद आहे. या केंद्राच्या इमारतीला गळती लागली असून येथे कुत्र्यांना कोंडण्यासाठी असलेले पिंजरे तुटलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून यांचा त्रास सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे़.
महानगरपालिकेच्या वतीने कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी तीन वर्षांचे कंत्राट ग्लोबल उत्कर्ष फाउंडेशन, मुंबई यांना दिले होते़ या कंत्राटामध्ये प्रति कुत्र्याचे निर्बीजीकरण करण्यासाठी मार्च २०२२ महिन्यात ९९९ रूपये देण्याचे ठरले होते़ परंतू हे केंद्र पडले.‍ मार्च ते आॅगस्ट या महिन्यात निर्बीजकरण करण्यात आले, मात्र त्यानंतर हे केंद्र बंद पडले़ हे केंद्र ज्या परिसरात आहे त्याठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी हे केंद्र सुरू करण्यास विरोध केल्यानंतर या केंद्रकडे दुर्लक्ष झाल्याने या केंद्रातील साहित्याची दुर्दशा झाली आहे़.
६०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण
केंद्र सुरू झाल्यानंतर पाचशे ते सहाशे कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे़ यात सर्वांधीक एप्रिल महिन्यात २११ तर मे मध्ये १७१ कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे़.
प्रति कुत्र्यांचे निर्बीजीकरण ९९९ रूपयांना
कुत्र्यांचे निर्बीजीकरणाचे कंत्राट ग्लोबल उत्कर्ष फाउंडेशन, मुंबई यांना २०२२ मध्ये दिले होते़ या कंत्राटामध्ये प्रति कुत्र्याचे निर्बीजीकरण करण्यासाठी मार्च प्रती कुत्रे ९९९ रूपये देण्याचे ठरले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.