रस्ता खोदल्याने वाहतुकीस अडथळा

0 142

रस्ता खोदल्याने वाहतुकीस अडथळा

 

 

खामगाव (नंदकिशोर भारसाकळे): शेतीला जोडण्यासाठी पाणंद रस्ते आणि शहराला जोडण्यासाठी गाव रस्ते दुरुस्त केले जात आहेत. मात्र खामगाव शहरातील चांगला रस्ता खोदून ठेवल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत असल्याने या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

शहरातील खामगाव वाडी ते जलंब रोड हा रस्तावरील जीएस कॉलेज ते ड्रिमलँड शिटी पर्यंत जाणा-या या रस्त्याचे मागील सहा महीन्यापुर्वी खोदकाम करून ठेवले आहे. हे काम सुरू होते, मात्र ते काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे या रस्त्यावर वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे तर प्रवाशांना डोळे बंद.

खामगाव शहराची दुसरी ओळख म्हणजे माजी आमदार दिलीपकुमार सांनंदा काॅग्रेस व सध्याचे आ. आकाश फुंडकर भाजपा हे याच गावचे रहिवासी आहेत. हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा या मागणीचे निवेदन गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे दिले, मात्र या मागणीकडे प्रशासनाकडून डोळेझाक होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्यावर जीएस महाविद्यालय असल्याने खड्डेयुक्त रस्त्याचा व धुळीचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या रस्त्याकडे स्थानिकचे पुढारी आणि प्रशासन केव्हा लक्ष देणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.