अनेक वर्षापासून परळी मध्ये ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करा – बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे संभाजी ब्रिगेडची मागणी

0 50

अनेक वर्षापासून परळी मध्ये ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करा – बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे संभाजी ब्रिगेडची मागणी

 

परळी (वार्ताहर) : शहरांमध्ये विविध कार्यालयांमध्ये मागच्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्यात याव्यात. या मागणीचे निवेदन बीड जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले.दिनांक ०२ मार्च २०२३ रोजी उपविभागीय अधिकारी परळी वै यांना निवेदन देण्यात आलेले होते. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, विभागीय आयुक्त साहेब,व बीड जिल्हाधिकारी यांना इमेल द्वारे निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाच्या अनुषंगाने दिनांक ०३ एप्रिल २०२३ रोजी बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने भेटून व प्रत्यक्ष चर्चा करून लेखी निवेदन देण्यात आले. मागच्या अनेक वर्षापासून परळी शहरातील विविध कार्यालय जसेकी तहसील कार्यालय, कृषी कार्यालय, पोलीस स्टेशन, नगरपरिषद, पंचायत समिती यासह इतर कार्यालयामध्ये अनेक वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ बदली करून होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेच्या निवडणुका पारदर्शक पार पाडाव्यात यासाठी निवेदन देण्यात आले. मागच्या अनेक वर्षापासून हे अधिकारी परळीत ठाण मांडून बसल्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुका पार पाडण्याच्या अनुषंगाने या निवडणुकीत प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष सबंध येणारे वेगवेगळ्या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ हलवून त्या ठिकाणी नवीन अधिकारी /कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात यावे व ती निवडणूक पारदर्शकपणे पार पाडावे अशा पद्धतीची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे बीड जिल्हाधिकारी यांना करण्यात आली असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे परळी वै. तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.