अरविंद पापा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

0 165

अरविंद पापा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

अंजनडोह (प्रतिनिधी) : आडस येथील सेवानिवृत्त अभियंते अरविंद पापा देशमुख यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आडस, जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा आडस व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दु आडस येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करतेवेळी डॉ.आर.बी.बाहेती, याच शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबळगावकर, केंद्रीय मुख्याध्यापक अनंत शेळके,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केकाणवाडीचे मुख्याध्यापक शेख असाहबोद्दीन यांच्यासह शिक्षक व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अनंत शेळके म्हणाले, की अरविंद पापा व डॉ.बाहेती साहेब हे याच शाळेचे माजी विध्यार्थी आहेत.पापांनी आपला वाढदिवस शालेय विद्यार्थ्यां बरोबर साजरा करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून स्तुत्यउपक्रम राबविल्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.शेख असाहबोद्दीन यांनी आपल्या मार्गदर्शनात विध्यार्थ्यांना सांगितले ,की अरविंद पापा, डॉ.बाहेती व बाबळगावकर यांनी त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे,आपण सुध्दा त्यांच्या सारखे उच्च शिक्षित व्हावे असे विदयार्थ्यांना आवाहन केले.या प्रसंगी बाबळगावकर यांनी बालकविता सादर करून विध्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी विकास काशीद, शामसिंग पवार,शाम आकुसकर,श्रीमती माळी, श्रीमती शिंदे,श्रीमती नागपुरे,श्रीमती माले, श्रीमती शेख, दत्ता ठोके, अतुल वखरे, अशोक चाटे, बांडे यांच्यासह पालक, शिक्षक व विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.