कलिंगड उत्पादक शेतकरी देशोधडीला

0 40

कलिंगड उत्पादक शेतकरी देशोधडीला

सोलापूर : गेल्या महिन्यात राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात ऐन रब्बी हंगामामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला कारण त्याने पिकविलेल्या मालाला कवडीमोल दर मिळू लागला. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला त्यामुळे अनेकांनी पिकावर नांगर फिरवला तर काहींनी जनावरं फिरवली. अनेक शेतकरी उन्हाळ्याच्या आधी कलिंगड पीक घेतात. मात्र यावर्षी कलिंगड पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र मोठा आर्थिक फटका बसला आहे.

उन्हाळ्यात कंलिगड या फळाला जास्त मागणी असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी रामभाऊ रोडगे यांनी आपल्या शेतात त्याची लागवड केली पण त्यातून त्यांना फायदा होण्याऐवजी मोठा तोटा सहन करावा लागला आहे. कलिंगड पिक घेण्यासाठी त्यांनी जेवढा खर्च केला गेला होता, तेवढाही खर्च कलिंगड पिकातून निघाला नाही. रामभाऊ रोडगे या शेतकऱ्याला तीन क्विंटल कलिंगड विक्रीनंतर अवघे ३ हजार ४०० रुपये मिळाले आहेत. त्यामुळे कलिंगडाला केवळ ८० पैसे प्रति किलो हा मातीमोल भाव मिळाला आहे.

रामभाऊ रोडगे या शेतकऱ्याला पैसे मिळण्याऐवजी ४६५० रुपये पदरचे पैसे खर्च करून त्यांना आपल्या घरी परतावे लागले आहे. त्यांची करमाळ्यात तीन एकर शेती असून त्यातील दोन एकरमध्ये कलिंगडची लागवड केली आहे. त्यासाठी १ लाख २० हजार रुपयांचा खर्च आला. पण उत्पादन झाल्यानंतर त्यांनी यातील तीन टन कलिंगड विक्रीसाठी सोलापूर बाजार समितीत आणले होते. हे तीन टन कलिंगड काढण्यासाठी मजुरी अडीच हजार रुपये, गाडी भाडे ४ हजार ५०० रुपये, हमाली ९६० रुपये, असा एकूण ७ हजार ९६० रुपये खर्च आला. या कलिंगडाला दर मात्र ३४०० रुपये मिळाला. त्यामुळे उत्पादन खर्च तर मिळालाच नाही याउलट नुकसान सोसून घरी परतावे लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.