चिंचोली येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0 40

चिंचोली येथे शेतकऱ्याची गळफास
घेऊन आत्महत्या

 

कंधार (नितीन कोकाटे): तालुक्यातील चिंचोली येथील त्र्यंबक शंकराव कौसल्ये ( वय ४५) या शेतकऱ्याने सततच्या नापिकी व महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्जाच्या नोटीसमुळे २२ जून रोजी रात्री गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
चिंचोली येथील त्र्यंबक शंकरराव कौसल्ये हे तरुण शेतकरी होते ते सुशिक्षित आणि सामाजिक कार्यात अग्रेसर होते, त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक बारूळ या शाखेतून पाच ते सहा वर्षांपूर्वी एक लाख तीस हजार रुपये कर्ज उचलले होते. सदरील कर्जाची परतफेड सततच्या नापिकीमुळे बँकेला
करता आली नाही. गेल्या एक महिन्यापासून सततच्या बँकेच्या नोटीस तसेच मोबाइलद्वारे मेसेजद्वारे येत होते. तसेच उद्याच्या येणाऱ्या खरीप पेरणीची पैशाची जोडाजोड यासोबतच जून महिना संपत आला असून तरीही पाऊस पडत नसल्यामुळे या सर्व विवंचनेतून या तरुण शेतकऱ्यांनी घराजवळच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या तरुण शेतकन्याच्या मृत्यूने गावात व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पाश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. कंधार पोलिस स्टेशन येथे आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक आर. एस. पडवळ हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.