घाटपुरी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची बिटंबना

0 623

घाटपुरी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची बिटंबना

 

खामगाव (नंदकिशोर भारसाकळे): तालुक्यातील घाटपुरी येथे काही समाज कंटकांकडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात लावलेल्या होर्डिंगवर शेण फेकल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे घाटपुरी सह संपुर्ण तालुक्यातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात यापुर्वीही काही विघ्नसंतोषी मनुवादी विचारधारेच्या लोकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. तसाच प्रकार काल दि. २० एप्रिल रोजी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काही जातीयवादी समाजकंटकांनी शहरात लावलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेल्या होल्डिंगवर शेण फेकल्याचा प्रकार घडवल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना आज सकाळी जेव्हा लोकांच्या नजरेस पडली तेव्हा या घटनेचा निषेध केला. सदरील घटनेच्या ठिकाणी आंबेडकरी समाजाने एकत्रित येत हे कृत्य करणारांना तात्काळ अटक करा अशी मागणी करताना दिसत आहेत.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साज-या होणा-या कार्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी इथली मनुवादी व्यवस्था नेहमी कार्यरत असते. मात्र बहुजन चळवळींनी केलेल्या कार्यामुळे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याने ब्राम्हणवादी लोकांचे हस्तक असे कृत्य करून सामाजिक तेढ निर्माण करतात अशा विघ्नसंतोषी लोकांनी वेळीच लगाम घातला पाहीजे अशी मागणी आंबेडकरी समाजाकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.